प्रभाकर शहाकार।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : येथील राष्ट्रीय मार्ग अनेकदा दुरूस्तीचे काम हाती घेतल्यानंतर गुळगुळीत करण्यात आला. परंतु, वाहनचालकांसाठी सर्वात मोठी समस्या ठरु पाहणाऱ्या पुलगाव येथील रेल्वे उड्डाण पुलाची समस्या जैसे थे असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.ग्रामीण भागाचा विकास व्हावा या हेतूने नागपूर-औरंगाबाद हा ३८६ कि.मी. चा द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला. शिवाय हैदराबाद-भोपाल या राष्ट्रीय महामार्गामुळे अनेक गावे मोठ्या शहरांशी जोडली जाणार आहेत. तर भद्रावती-पुलगाव-आमला ही महत्त्वाची केंद्र जोडली जाणार आहेत.असे असले तरी पुलगाव येथील रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रेल्वे फाटक नेहमीच बंद राहत असल्याने तेथे वाहतुकीची कोंडी होते. रेल्वे उड्डाण पुलासाठी एक-दोन कोटी नव्हे तर तब्बल ४५ कोटी मंजूर झाले आहेत. असे असले तरी मागील सात वर्षांपासून काम कासवगतीनेच केले जात आहे. त्यामुळे पुलगाव येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.खासदारांच्या प्रयत्नाअंती २१ पिलर्स उभेउड्डाणपूलाचा प्रश्न रेंगाळत असल्याचे लक्षात येताच खा. रामदास तडस यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर उड्डाण पुलाच्या ३४ पिलर्स पैकी २१ पिलर्सचे काम सुरू झाले. शिवाय नाल्यावर दोन पुलही बांधण्यात आले. नाचणगाव रोड ते पंचधारा मार्गाचे दोन्ही बाजूने रूंदीकरण करून खडीकरणही करण्यात आले. पण सध्या हे काम बंद आहे.४५ कोटींचा निधी मंजूरवाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेऊन राज्य व केंद्र शासनाने ६५६ मिटर लांबी व १२ मिटर रूंदी असलेल्या तीन पदरी मार्गाला मान्यता दिली. तसेच राज्य शासनाचे ३५ कोटी व रेल्वे विभागाचे १० कोटी असे ४५ कोटींचा निधी उड्डाणपुलासाठी मंजूर झाला. रेल्वे विभागाचे तीन पिलर्स मिळून एकूण ३४ पिलर्सवर हा उड्डाणपुल उभा राहणार आहे.रणजीत कांबळेंनी केले भूमिपूजननियोजन प्रकरण क्र. ६७९/नियोजन-३ २७ मे २०१४ अन्वये राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देवून बांधकामाच्या निविदाही काढल्या. जून २०१४ मध्ये पुरवणी अर्थ संकल्पात नव्याने समाविष्ठ करून आर्थिक तरतूदही करण्यात आली. इतकेच नव्हे तर तत्कालीन मंत्री तथा विद्यमान आ. रणजीत कांबळे यांच्या हस्ते आॅगस्ट २०१४ मध्ये भूमिपूजनाचा सोपस्कार पूर्ण झाला. मात्र, उड्डाण पुलाचे काम कासवगतीनेच होत आहे.मुख्य कंत्राटदार व सह कंत्राटदार यांच्यात वाद झाल्यामुळे कंत्राटदाराने काम सोडल्याचे आणि त्याचा परिणाम या उड्डाण पुलाच्या बांधकामावर झाल्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी सांगतात. इतकेच नव्हे तर गुजरात येथील दुसऱ्या कंपनीच्या साझ्याने काम सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. बांधकाम विभागाने उड्डाण पुलाचे काम तात्काळ पूर्णत्त्वास नेले पाहिजे. शिवाय कामात हयगय करणाºया कंत्राटदारावर कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे.- रामदास तडस, खासदार, वर्धा.
रेल्वे उड्डाणपुलाचे काम थंडावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 6:00 AM
ग्रामीण भागाचा विकास व्हावा या हेतूने नागपूर-औरंगाबाद हा ३८६ कि.मी. चा द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला. शिवाय हैदराबाद-भोपाल या राष्ट्रीय महामार्गामुळे अनेक गावे मोठ्या शहरांशी जोडली जाणार आहेत. तर भद्रावती-पुलगाव-आमला ही महत्त्वाची केंद्र जोडली जाणार आहेत.
ठळक मुद्देफाटक राहते नेहमी बंद : समस्येकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष