शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

रेल्वे स्थानकाचा फलाट प्रवासी निवाऱ्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:10 PM

येथील रेल्वे स्थानकांच्या फलाट क्रमांक २ वर यात्री शेडचे काम सुरू न झाल्याने प्रवाशांना पाऊस व उन्हात थांबावे लागत आहे. यामुळे रेल्वे प्रवाश्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनव्या ओव्हर ब्रीजचे काम पूर्ण : पावसात थांबतात प्रवाशी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील रेल्वे स्थानकांच्या फलाट क्रमांक २ वर यात्री शेडचे काम सुरू न झाल्याने प्रवाशांना पाऊस व उन्हात थांबावे लागत आहे. यामुळे रेल्वे प्रवाश्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.हिंगणघाट रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ आणि २ वरील प्रवाश्यांना रेल्वे पार करण्यासाठी पायदळ मार्ग म्हणून नव्याने ओव्हर ब्रीज बनविण्यात आला आहे. जुना पुल तोडून रेल्वेच्या तिसऱ्या मार्गाचे रूंदीकरण लक्षात घेवून नवीन अधिक लांबीचा हा नवीन पुल पादचाºयांना ये-जा करण्याकरिता नुकताच तयार करण्यात आला. नवीन पुल उभारण्याकरिता तेथे असलेल्या रेल्वेच्या प्रवाशी शेडला काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे तेव्हापासून फलाट क्रमांक २ वर प्रवासी निवारा राहिलेला नाही. रेल्वे प्रशासनाने ओव्हर ब्रिज बांधताना प्रवासी निवारा सुद्धा बांधण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही प्रवासी निवाºयाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे प्रवाश्यांना विनाकारण ऊन, पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे.या स्थानकावर ये-जा करण्याची संख्या बरीच मोठी आहे. वर्धा-चंद्रपूर या दरम्यानचे हे मोठे रेल्वे स्थानक आहे. येथे ८ गाड्यांना स्टॉपेज असून प्रवाशांची गर्दी असते. पावसाने केव्हाही हजेरी लावल्यास प्रवाशांना अचानकरित्या आसरा घेण्यासाठी पायऱ्यांचा पुल ओलांडून लगबगीने फलाट क्र. १ वर जाणे अत्यंत अवघड ठरते. त्यामुळे ओले होण्याशिवाय पर्याय उरत नाही. अलिकडे दुपारी उन्हाचा तडाखाही सुरू झाला असून या गर्मीत दुपारी विना शेडने उभे राहावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाश्यांनी केली आहे.या प्रश्नावर विभागीय रेल्वे प्रशासना आपचे प्रमोद जुमडे, मनोज रूपारेल यांनी तक्रार केली आहे.परंतु अजूनपर्यंत याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे प्रवाशांचा त्रास वाढत आहे. यावर तोडगा काढावा अशी मागणी आहे.