शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सोयाबीन व कपाशीला परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:05 AM

शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न घटणार : पाणबसन शेती राहिली पडीत, शासकीय यंत्रणा अद्यापही साखर झोपेतच लोकमत न्यूज नेटवर्क पवनार : ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न घटणार : पाणबसन शेती राहिली पडीत, शासकीय यंत्रणा अद्यापही साखर झोपेतच

शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न घटणार : पाणबसन शेती राहिली पडीत, शासकीय यंत्रणा अद्यापही साखर झोपेतचलोकमत न्यूज नेटवर्कपवनार : परतीच्या पावसाने जोर धरला नसला तरीही जेवढा बरसला तेवढ्यानेच सोयाबीन व उमललेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले. आहे. कोरडवाहू शेतकºयाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी त्याची भिस्त आता कपाशी व तूर या पिकावर आहे. मात्र, याचा परिणाम शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नावर होणार असून कर्जाचा डोंगर पुन्हा उभा ठाकणार आहे.कपाशीची फळ धरण्याची कालमर्यादा आता संपत आली आहे. परंतु अद्यापही कपाशीला बोंडच आलेले नाही. शिवाय पाने पिवळी पडून लाल्या यायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण होऊ लागल्याने हळूहळू पाने लाल पडून गळायला लागली. त्यामुळे बोंडे सुद्धा परिपक्व होत नाही. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता बळावली आहे. खरीप हंगामात पावसाला उशीरा सुरूवात झाल्यामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारातच गेली. काहीचे सोयाबीन विकण्यासाठी नेले असता ओलाव्याचे कारण सांगून त्यांना कवडीमोल भाव देण्यात आला. गतवर्षी वर्धा तालुक्यात शासनाची खरेदी केंद्रे उघडलीच नाही. यावर्षी सुद्धा काही हालचाली दिसत नाही. शेतकºयांवर येणारी संकटे पाहून कृषी विभाग सुद्धा हतबल झाला आहे. सुरूवातीला तोंड वर काढणाºया बोंडअळीवर नियंत्रण असले तरी अद्याप धोका टळलेला नाही. शितदही करून कापूस वेचणीला सुरूवात होणार एवढ्यातच आलेल्या पावसाने कापूस ओला झाला. आता तो वाळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार.पीक विम्याचा लाभ नाही.पीक विम्याचे निकष मोठे क्लिष्ट असून भूस्सखलन,नाल्याच्या, नदीच्या पाण्यामुळे पीक खरवडून जाणे, वीज पडून नुकसान होणे किंवा महसूल मंडळात सलग ६५ मि.मी. च्या वर पाऊस पडल्यावरच शेतकरी भरपाईस पात्र ठरतो. किंवा पीक कापणीनंतर सलग १४ दिवस पाऊस पडल्यास नुकसानीस पात्र ठरविल्या जाते. यावरुन निकष तयार करणारे कुठला विचार करून निकष ठरवितात हे आता समजण्यापलीकडे आहे.पाणबसन क्षेत्र पूर्णत: नष्टपाणी धरून ठेवणाºया जमिनीतील कपाशीची वाढ तर झालीच नाही. शिवाय सोयाबीन सुद्धा जागेवरच जिरले. अशा जमिनीतील खरीपाचे पीक काढून कोरडवाहू चना घेण्याच्या तयारीला शेतकरी लागला आहे. अनुदानावर मिळणाºया महाबीजच्या सोयाबीनची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचलीच नाही. काही विक्रेत्यांकडे हे सोयाबीन अनुदानावर विक्रीला ठेवले जाते. तेही विशिष्ट लोकांनाच मिळते सर्व साधारण शेतकरी मात्र अनभिज्ञ असतो. त्याची कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे. कारण अनुदानावर मिळणारे बियाणे हे सर्वांसाठी खुले असायला पाहिजे. महाबिजच्यावतीने देण्यात येणाºया बियाण्यांवर कृषी विभागाचा कुठलाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागही अनुदानावर बियाणे उपलब्ध करतो. परंतु नेहमीप्रमाणेच हंगाम संपत आल्यावर वरातीमागून घोडे अशी परिस्थिती कृषी विभागाची झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती