लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शुक्रवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार वर्धेत बऱ्याच दांडीनंतर वरूण राजा बरसला. देशात सर्वाधिक पाऊस वर्धा जिल्ह्यात झाल्याची नोंद स्कायमेट व्हेदर यांनी घेतली आहे. त्यांनी ११७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. देशातील १० पावसाच्या ठिकाणावर ही माहिती गोळा करण्यात आली. वर्धेत २२ सप्टेंबर सरासरी ६९७.९४ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली.२२ सप्टेंबर रोजी सेलू तालुक्यात सेलू येथे ९८ मि.मी., सिंदी (रेल्वे) ८७ मि.मी. , हिंंगणी ७२ मि.मी., झडशी ८१ मि.मी., केळझर ८६ मि.मी. असा एकूण ४२४ मि.मी. पाऊस ८४.०८ मि.मी. सरासरीने पडला. आष्टी तालुक्यात आष्टी येथे ४१.२ मि.मी., साहूर येथे ५४ मि.मी., तळेगाव ५०.२ मि.मी. पाऊस झाला. ४८.४६ च्या सरासरीने १४५.४ मि.मी. पाऊस झाला. आर्वी येथे ५१ मि.मी., वाटोडा येथे ५६ मि.मी., वाढोणा येथे ८ मि.मी., विरूळ येथे ७४ मि.मी., रोहणा येथे ६१मि.मी., खरांगणा येथे ४७.४ मि.मी. पाऊस ४९.५६ च्या सरासरीने झाला. या तालुक्यात २९७.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. समुद्रपूर येथे ९१ मि.मी., जाम येथे ५५ मि.मी., गिरड येथे ५५ मि.मी., नंदोरी येथे १०० मि.मी., कोरा येथे ५५ मि.मी., वायगाव (गों.) येथे ५९.२ मि.मी., कांढळी येथे १०० मि.मी., मांडगाव येथे ८८ मि.मी. पाऊस झाला. समुद्रपूर तालुक्यात ७५.४ मि.मी. च्या सरासरीने ६०३.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. हिंगणघाट तालुक्यात २२६. २४ मि.मी. पाऊस झाला आहे. हिंगणघाट येथे २३९.५ मि.मी., सावली (वाघ) २५२ मि.मी., वडनेर येथे १९७. ४ मि.मी., पोहणा येथे १९० मि.मी., सिरसगाव येथे २२० मि.मी., अल्लीपूर येथे २४० मि.मी., कानगाव येथे २४६ मि.मी., वाघोली २२५ मि.मी. पाऊस झाला. देवळी तालुक्यात देवळी येथे १४४.२ मि.मी., भिडी येथे १३० मि.मी., अंदोरी येथे ५५ मि.मी., गिरोली २०० मि.मी., पुलगाव येथे १६६ मि.मी., विजयगोपाल येथे ४० मि.मी. पाऊस झाला. देवळी तालुक्यात सरासरी १२२.५३ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. संपूर्ण वर्धा जिल्ह्यात ९९.३० मि.मी. सरासरीने ७८४.३६ मि.मी. पाऊस झाला. २२ सप्टेंबर या एकाच दिवशी वर्धा तालुक्यात १२१.८५ मिमी., सेलू येथे ७७७.५८, देवळी येथे ७०८.७६, हिंगणघाट येथे ९५५.३० मि.मी., समुद्रपूर येथे ६८७.२८ मि.मी., आर्वी येथे ६२२.१८, आष्टी येथे ५४४.०५ मि.मी., कारंजा येथे ५९१.६२ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात ५५८३.५१ मि.मी. पाऊस, ६९७.९४ च्या सरासरीने झालेला आहे. या पावसानंतर सोयाबीन पिकाला काही दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यावर दृष्काळाचे सावट आहे.
वर्ध्यात देशात सर्वांधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:39 PM
शुक्रवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार वर्धेत बऱ्याच दांडीनंतर वरूण राजा बरसला. देशात सर्वाधिक पाऊस वर्धा जिल्ह्यात झाल्याची नोंद स्कायमेट व्हेदर यांनी घेतली आहे. त्यांनी ११७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. देशातील १० पावसाच्या ठिकाणावर ही माहिती गोळा करण्यात आली.
ठळक मुद्देएकाच दिवशी ६९४ मि.मी. पाऊस : सर्व तालुक्यात बरसला वरूणराजा