लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शनिवारी रात्री उशीरा वर्धा शहरासह परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वर्धा शहरासह काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तर काही ठिकाणी घरांवरील टीनपत्रे उडाली. शिवाय उभ्या पिकांनाही या वादळीवाऱ्यांचा चांगलाच फटका बसला.वायगाव (नि.) परिसरात वादळीवाऱ्यासह पावसाने चांगलाच कहर केला. वादळीवाऱ्यामुळे काही काळाकरिता विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तर भागातील शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांना वादळीवाऱ्याचा चांगलाच फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.पवनार येथे वादळीवाऱ्यासह पावसामुळे सुमारे २०० वर्ष पूर्वीचे चिंचेचे झाड उन्मळून पडले. येथील हजरत सय्यद अहमद कबीर दर्गाह परिसरात हे झाड होते. घटनेच्यावेळी परिसरात कुणी नसल्याचे पुढील अनर्थ टळला. याभागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे बच्चेकंपनीसह वृद्धांना नाहक त्रास सहन करीत रात्र काळोखात काढावी लागली.घोराड परिसरात शनिवारी रात्री झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे काहींच्या घरांवरील टीनपत्रे व कवेलू उडाली. परिणामी, नुकसानग्रस्तांचा संसार उघड्यावर आला आहे. तर काही काळाकरिता या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या वादळीवाऱ्यामुळे अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. खुशाल महाकाळकर, प्रभाकर पोहाणे आदींचे वादळीवाऱ्यामुळे चांगलेच नुकसान झाले आहे. या भागात केळी, डाळिंब पपई आदीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. मात्र, शनिवारी आलेल्या वादळीवाºयासह पावसामुळे केळी, डाळिंब व पपईच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे वादळवाºयासह झालेल्या पावसामुळे मारोती रामाजी धस यांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. सदर घटनेपूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने आणि उकाड्याच्या त्रासामुळे घरातील सर्व सदस्य घराबाहेर पडले होते. परिणामी, पुढील अनर्थ टळला. मारोती धस यांच्या घरावरील टीनपत्रे उडाली असून घराच्या भिंतीही बºयापैकी खसल्याने त्यांचे सुमारे ८० हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. शनिवारच्या वादळवाऱ्यामुळे तालुक्यात वाघोली वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे तहसीलदार श्रीराम मुंधडा यांनी सांगितले.
वादळीवाऱ्यासह पावसाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:10 PM
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शनिवारी रात्री उशीरा वर्धा शहरासह परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वर्धा शहरासह काही भागातील ...
ठळक मुद्देघरांवरील टीनपत्रे उडाली : उभ्या पिकांना फटका, विद्युत पुरवठाही झाला होता खंडित