आॅनलाईन लोकमतवर्धा : जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी व नवीन म्हाडा कॉलनी येथील रहिवासी राकेश देवीदास काळे यांनी अंटार्टिका पर्वतावरील सर्वात उंच शिखर माऊंट विन्सन सर केले. याबद्दल आ.डॉ. पंकज भोयर यांनी राकेश काळे यांचा त्यांच्या निवासस्थानी भेट घेत सत्कार केला.काळे यांनी भारतीय वायुदलाच्या पाच सदस्यीय चमुसोबत नुकतेच अंटार्टिका पर्वतावरील सर्वात उंच व कठीण माउंट विन्सन शिखरावर भारताचा तिरंगा व वायुदलाचा ध्वज रोवला. अत्यंत कठीण कामगिरी पूर्ण करून राकेश काळे भारतात परत आले. ते सुटीवर वर्धा येथे असल्याची माहिती मिळताच आ.डॉ. भोयर यांनी त्यांच्या घरी भेट दिली. भारताचे, महाराष्ट्राचे व जिल्ह्याचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचा सपत्निक सत्कार केला. यावेळी उमेश अग्निहोत्री, राजेंद्र काणे, अनंत झाडे, देवीदास काळे आदी उपस्थित होते.
माऊंट विल्सन सर करणाºया राकेशचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:42 PM