लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इंधनाची दरवाढ व महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती कमी असून राज्यात पेट्रोलचे भाव ८१ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. याचा परिणाम सर्वसामान्यवर पडत असल्याचा आरोप करीत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात शिवाजी चौक ते बजाज चौक दुचाकी ढकलत नेत पेट्रोल दरवाढ व महागाईचा निषेध नोंदविला.या मोर्चादरम्यान भाजप सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करीत बजाज चौक येथे पक्षाच्या कार्यालयात मोर्चाचा समारोप करण्यात आला. पक्ष कार्यालयात झालेल्या समारोपमध्ये जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, महिला अध्यक्ष शरयु वांदीले, दिवाकर गमे, अल्पसंख्यासक सेलचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. खलील खतीब, रायुकाँ जिल्हाध्यक्ष संदीप किटे, जि.प. सदस्य धनराज तेलंग यांनी भाजप सरकारच्या धोरणा विरोधात भूमिका मांडल्या.आधी नोटाबंदी, मग जीएसटी आणि आता सातत्याने पेट्रोलमध्ये होणारी दरवाढ ही सामान्यांना न पेलवणारी आहे. आधीच जनता महागाईमुळे कचाट्यात सापडली असून गृहिणीचे बजेट पूर्णत: कोलमडले आहे. सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. शेतकरी कर्जमाफी पेक्षा बुलेट ट्रेन ही देशांची अंत्यत निकड असल्याचे सरकारला वाटते आहे. हजारो कोटी रुपये यावर खर्च होत आहे. मात्र शेतकºयांना कर्जमाफी करताना जाचक अटी लादल्या जात आहे.जनतेच्या हिताविरोधात होत निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही. यासाठी आम्ही वारंवार रस्त्यावर उतरू असा इशारा समीर देशमुख यांनी मोर्चाचा समारोप करताना दिला. यानंतर समीर देशमुख यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर केले. मोर्चामध्ये माजी नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, न.प. सदस्य मुन्ना झाडे, विद्याधर वानखेडे, सुनील भोगे, सिंधु साबळे, प्रिती शिंदे, नितीन देशमुख, मिलिंद हिवलेकर, मनोहर जग्यासी, संजय काकडे, नामदेव मसराम, अजित ठाकरे, निखिल येलमुले, राविकाँ अध्यक्ष राहुल घोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग घेतला.
महागाई विरोधात राकाँचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:53 PM
इंधनाची दरवाढ व महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती कमी असून राज्यात पेट्रोलचे भाव ८१ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.
ठळक मुद्देदुचाकी ढकलत नेत बजाज चौकात नोंदविला निषेध