वर्धा - घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात महिला - युवतींप्रति लज्जास्पद वक्तव्य करणाऱ्या आमदार राम कदम यांच्या फोटोला शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक भगिनींनी बांगड्यांचा अहेर देत चपलांचा चोप दिला.
ठाकरे मार्केट समोर आज हा निषेध नोंदविण्यात आला. नावात राम पण कर्तृत्वात रावणासारखे कर्म करणाऱ्या भाजपा चे आमदार राम कदम याला शिवसेना भगिनींच्या स्वाधीन करण्याची मागणी यावेळी तालुका संघटिका हर्षा हटवार यांनी लावून धरली. निषेध उपक्रमात जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांच्या नेतृत्वात महिला आघाडी तालुका संघटिका हर्षा हटवार, शहर संघटिका जयश्री भुरे यांनी हा तीव्र निषेध नोंदविला.
यावेळी गायत्री रोकडे, निर्मला पवार,अरुणा मोरे, रत्नमाला मोहनपवार, लैजाबाई धुमाळ, कांताबाई मोरे, वैजबाई महापुरे, वर्षा भिसे, विमल मोरे, गोकर्णा चव्हाण, सोनाली लाडेकर, विमल देशमुख, उपजिल्हाप्रमुख किशोर बोकडे, तालुकाप्रमुख गणेश इखार, शहरप्रमुख लखन लोंढे, उपतालुकाप्रमुख प्रमोद देवढे, प्रभाकळ देऊळकर, उपशहरप्रमुख भालचंद्र साठोने, खुशाल राऊत, युवासेना जिल्हा समन्वयक मयूर जोशी, उपजिल्हाधिकारी बादल श्रीवास, शहर अधिकारी शार्दूल वांदीले, विशाल व्यास, संतोष सेलूकर, विशाल चव्हाण, गजानन खडसे, गोपाल हांडे यांच्यासह अनेक शिवसेना भगिनी व शिवसैनिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.