शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

रामदास तडस १ लाख ८७ हजार मतांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:20 PM

लोकसभा मतदार संघातून भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस १ लाख ८७ हजार १९१ मतांनी विजयी झाले आहेत. लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली. व शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास संपली. सुमारे २० तास मतमोजणी चालली. त्यानंतर पहाटे या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देपहाटे ४ वाजता संपली मतमोजणी : धामणगाव विधानसभा क्षेत्राची प्रक्रिया अतिशय संथ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा मतदार संघातून भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस १ लाख ८७ हजार १९१ मतांनी विजयी झाले आहेत. लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली. व शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास संपली. सुमारे २० तास मतमोजणी चालली. त्यानंतर पहाटे या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. तडस यांना ५ लाख ७८ हजार ३६४ मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस यांना ३ लाख ९१ हजार १७३ मते मिळाली.तडस यांनी टोकस यांचा १ लाख ८७ हजार १९१ मतांनी पराभव केला. तडस हे दुसऱ्यांदा लोकसभेसाठी विजयी झाले आहेत. त्यानंतर तडस यांना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले. तब्बल वीस तास चाललेल्या या मतमोजणीत सुरुवातीला सहाही विधानसभा ईव्हीएम मशीनची मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या २८ फेºया पार पडल्या. काही विधानसभा क्षेत्राच्या फेºया आटोपल्या; मात्र धामणगाव विधानसभा क्षेत्राची फेरीनिहाय मतमोजणी मंदावल्याने बराच काळ निकालाची प्रतीक्षा करावी लागली. शेवटच्या फेरीत पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. मात्र, ईव्हीएमच्या मोजणीचे कल गुरुवारी दुपारी ४ वाजतानंतर येऊ लागल्याने भाजप उमेदवाराच्या आघाडीचे चित्र निर्माण झाले आणि भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला होता. अखेर अंतिम मतमोजणीत भाजपाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.या निवडणुकीत बसपाचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांना ३६ हजार २९६ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. धनराज वंजारी यांना ३६ हजार १४९ मते मिळाली. अन्य उमेदवारांमध्ये गणेश लाडे यांना ६ हजार १२४, प्रवीण गाढवे ३ हजार १८८, जगदीश वानखेडे यांना १ हजार ७२०, प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांना १ हजार १३५, अरविंद लिल्लोरे यांना ७५४, उमेश नेवारे यांना ३ हजार १७, झित्रुजी बोरूटकर यांना १ हजार ३१८, नंदकिशोर सागर मोरे १ हजार ६४३, राजेश बालपांडे २ हजार १३० अ‍ॅड. भास्कर नेवारे २ हजार ६१९ मते मिळाली आहे. ६ हजार ५१० मतदारांनी नोटाचा वापर केला तर ८७ मते अवैध ठरले आहे. ही मते पोस्टल बॅलेटची आहेत.वंचित आघाडीची मुसंडीमहाराष्ट्राच्या विविध लोकसभा मतदार संघात काँग्रेस, राकॉ उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडविणाºया वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. धनराज वंजारी यांनी घेतलेल्या ३६ हजार ४५२ मतांमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडी या लोकसभा मतदार संघात एवढी मजल मारेल असे अनेकांना वाटले नव्हते. मात्र त्यांच्या मतांमुळे आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. बसपाच्या हत्तीच्या कमी मत्ताधिक्याचीही चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसला यावेळी पहिल्यांदा २०१४ च्या तुलनेत ६४ हजार मते अधिक मिळाले आहे. तर भाजपलाही ४० हजार मताची वाढ झाली आहे. काँग्रेसची वाढलेली मते ही ग्रामीण भागातील असल्याचे दिसून येत आहे.देवळीत भाजपला आघाडीदेवळी हा काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या प्रभाराव यांचा बालेकिल्ला. सध्या किल्ल्याचे शिलेदार आमदार रणजित कांबळे हे आहेत. ते प्रतिनिधीत्व करीत असलेल्या या विधानसभा मतदार संघात रामदास तडस यांनी १६ हजार ८०० मतांची आघाडी घेतली आहे. येथे काँग्रेसला आघाडी मिळण्याची आशा होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालRamdas Tadasरामदास तडस