लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळखुटा : शासनाचे वन्यप्राण्यांप्रती असलेले प्रेम शेतकºयांच्या जीवावर उठले आहे. जंगली श्वापदे शेतात नुकसान करीत असले तरी शेतकºयांना उघड्या डोळ्यांनी ते पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. रानडुकरांनी शेतात हैदोस घालून सहा एकर पिकांचे नुकसान केले. या प्रकरणी भरपाई देण्याची मागणी शेतकºयाने केली.तरोडा येथील शेतकरी बसेश्वर आल्लेवार यांच्या शेतात रानडुकरांनी हैदोस घातला. यात ६ एकर कपाशी पिकाचे नुकसान झाले. शेतकºयाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कपाशीची झाडे अक्षरश: जमीनदोस्त झाली असून कापूस वेचणेही शक्य होत नाही. आधीच शेतीला मोठा खर्च लागला. त्यात उत्पादन कमी असून बाजारभाव अल्प आहे. मजुरांअभावी कापूस शेतातच आहे. यात जंगली श्वापदांचा त्रास असल्याने शेतकरी त्रस्त आहे. बसेश्वर अल्लेवार यांचे रानडुकरांमुळे सुमारे २० हजारांचे नुकसान झाले. याबाबत शेतकºयाने वनविभागाला माहिती दिली. त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यता यावी, अशी मागणी शेतकºयाने वन विभागाकडे केली आहे. यावर काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रोठा शिवारातही पिकांचे नुकसानवर्धा - रानडुकरांनी धुडगूस घालत शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हाती येणारे पीक रानडुकराचे कळप उद्ध्वस्त करीत आहे. रोठा शिवारात हा हैदोस मोठ्या प्रमाणात असून शेतकरी हतबल झाले आहेत. रोठा येथील गजानन बाडे यांच्या शेतातील कपाशीचे रानडुकरांच्या कळपाने नुकसान केल्याची घटना घडली. शेतकºयाच्या घरात येणारे पीक रानडुकरांनी लोळविले आहे. रोठा येथील बाडे यांच्याकडे पाच एकर शेती असून त्यातील दोन एकर शेत पूर्णत: उद्ध्वस्त केले. शासनाने रानडुकर मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
रानडुकराच्या हैदोसाने कपाशीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:32 PM
शासनाचे वन्यप्राण्यांप्रती असलेले प्रेम शेतकºयांच्या जीवावर उठले आहे. जंगली श्वापदे शेतात नुकसान करीत असले तरी शेतकºयांना उघड्या डोळ्यांनी ते पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : नुकसान भरपाईसाठी वनविभागाला साकडे