लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षण क्षेत्र आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याकरिता आवश्यक असलेले मार्गदर्शन शिक्षकांना देण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातील बड्या अधिकाºयांनी व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केले. या ग्रुपमध्ये शिक्षकांना जुळण्याचे आवाहन केले. या आवाहनानुसार शिक्षक यात जुळले; मात्र आता या ग्रुपमधून शैक्षणिक मार्गदर्शन नाही तर केवळ टपाली कामे होत आहेत. यातून अधिकाºयांचा अतिरेक होत असल्याचे म्हणत शिक्षकांनी या ग्रुपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय घेण्याकरिता कधी नव्हे त्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या १३ शिक्षक संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांची बैठक वर्धेत पार पडली. या बैठकीत शिक्षण विभागाच्या आॅनलाईन प्रकारामुळे मुख्याध्यापकच नाही तर शिक्षकही त्रस्त झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. आॅनलाईनच्या नावावर शिक्षकांचा शैक्षणिक छळ लावल्याचा आरोपही शिक्षकांचा आहे.ही आॅनलाईची कामे करताना अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाकडून केवळ आॅनलाईन कामे करण्याच्या सूचना आहेत. मात्र तशा कुठल्याही सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. संगणकावर काम करण्याकरिता शाळेला संगणक नाही, असलेल्या शाळेत आॅपरेटर नाही. यामुळे आॅनलाईनची कामे कशी करावी असा प्रश्न शिक्षकांचा आहे. शिवाय शिक्षकांकडे असलेले मोबाईल आणि त्यात वापरले जात असलेले इंटरनेट त्यांचे स्वत:चे आहे. त्याचा कुठलाही खर्च शासनाकडून या शिक्षकांना मिळत नाही. यामुळे शिक्षकांनी अधिकाºयांच्या आॅनलाईन ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात प्राथमिक शिक्षकांसह माध्यमिकच्या शिक्षकांचाही समावेश असल्याची माहिती आहे.अधिकाºयांच्या ग्रुपमधून टपाली सेवाशैक्षणिक कार्य करताना मार्गदर्शन करण्याकरिता अधिकाºयांचा ग्रुप असणे अपेक्षित आहे. सध्या मात्र त्यांचा ग्रुप टपाली सेवा पुरविण्याचे साधन झाला आहे. या ग्रुपमधून सभा, नोटीस बजावणे, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि शिबिराकरिता सूचना देणे, कोणत्याही कार्यक्रमाचे उपक्रमाचे फोटो अपलोड करणे आदी अशैक्षणिक कामे होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे शिक्षक वैतागले असल्याचे दिसून आले आहे.अधिकाºयांचे एकूण सात ग्रुपशिक्षकांना विविध सूचना देण्याकरिता जिल्ह्यात अधिकाºयांचे एकूण सात ग्रुप आहेत. यात सीआरसी, बीआरसी, पंचायत समिती, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, तंबाखुमूक्त अभियान, टेक्नोसॅव्ही, डीआयसीपीडी आदी ग्रुपचा समावेश आहे. यातून येणाºया सुचनांमुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत.शिक्षणाधिकाºयांना निवेदन सादरशिक्षकांकडून राबविण्यात येत असलेल्या या अभियानाबाबत शिक्षकांनी गुरुवारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदन सादर केले. या निवेदनातूनही शिक्षक संघटनांकडून होत असलेली अडचण शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आली.वर्धेत आतापर्यंत १ हजार शिक्षकांनी मारला लेफ्टअधिकाºयांच्या असलेल्या या सात ग्रुपमधून आतापर्यंत एकूण १ हजार शिक्षकांनी लेफ्ट मारल्याची माहिती आहे. इतर शिक्षकही या कामात आघाडीवर आहेत.शैक्षणिक मार्गदर्शनाचा उद्देश ठेवून तयार करण्यात आलेल्या अधिकाºयांच्या व्हॉटस्अॅप ग्रुपचा आता अतिरेक होत आहे. हे ग्रुप मार्गदर्शकाची नाही तर केवळ टपाली सेवा पार पाडत असल्याचे दिसून आले. यामुळे सर्वच शिक्षक संघटनांनी एक कृती समिती तयार करून या ग्रुपमधून बाहेर पडत बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला आहे.- लोमेश वºहाडे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघटना, वर्धा
शिक्षकांचा व्हॉटस्अॅप ग्रुपला रामराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:00 AM
शिक्षण क्षेत्र आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याकरिता आवश्यक असलेले मार्गदर्शन शिक्षकांना देण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातील बड्या अधिकाºयांनी व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केले.
ठळक मुद्देअधिकाºयांकडून अतिरेकाचा आरोप : १३ शिक्षक संघटनांची कृती समिती