लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलीस दलाने आधुनिकेतच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चालता-फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होत आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या अप्लिकेशनमुळे हे शक्य झाले आहे. जिल्ह्यात या अॅपच्या वापराला सुरुवात झाली आहे. एखाद्या गुन्ह्याची उकल करणे जेवढे अवघड, तेवढेच गुन्हेगारांचे रेकॉर्ड मिळवणे कठीण. मात्र, या अप्लिकेशनमुळे हे सोपे झाले आहे.रेकॉर्डबरोबर गुन्हेगारांवर न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याची व तारखांची माहितीही मोबाईलवरच मिळणार आहे. राज्यच नव्हेतर देशातील पोलीस दलासाठी हे कोर्ट चेकर अॅप उपलब्ध झाले आहे. हे अॅप कसे वापरावे याबाबतच्या कार्यशाळाही ठिकठिकाणी घेतल्या आहेत. एखाद्या गुन्ह्यात परजिल्ह्यातील किंवा परराराज्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती.न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती पोलिसांना तत्काळ मिळावी अशी पोलिसांची मागणी होती.कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोर्ट चेकर हे अॅप बनविले आहे. हे अप्लिकेशन बनविताना पोलीस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. हे अप्लिकेशन मोबाईलवर इन्स्टॉल करून घेतल्यानंतरच त्याची डाऊनलोडची खातरजमा केली जाते. संबंधित व्यक्ती पोलीस असला तरच अप्लिकेशनमध्ये साईन इन करता येणार आहे. ऑनलाईन व्हेरिफीकेशन झाल्याशिवाय हे अॅप वापरता येणार नाही....आरोपीचा फोटो टाकला तरी येणार रेकॉर्डकोर्ट चेकरमध्ये सध्या आरोपीचे संपूर्ण नाव, पत्ता टाकला की, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, रेकॉर्ड मिळते. मात्र, त्यामध्येही आधुनिकता आणून आरोपीचा फक्त फोटो टाकला तरी त्याची संपूर्ण ओळख, रेकॉर्ड मिळु शकले, असे नवीन फिचर कोर्ट चेकर अॅपमध्ये टाकण्यात आले आहे.कोर्ट चेकर अॅप पुणे येथील एका अभियंत्याने विकसीत केले आहे. वर्धा जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून प्रायोगिक तत्त्वावर या अप्लिकेशनचा वापर सुरु आहे. या अॅपमुळे आरोपींची जुजबी माहिती मिळण्यास मदत होत आहे.नीलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा.
‘कोर्ट चेकर’द्वारे गुन्हेगारांचे ‘रेकॉर्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 5:00 AM
न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती पोलिसांना तत्काळ मिळावी अशी पोलिसांची मागणी होती. कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोर्ट चेकर हे अॅप बनविले आहे. हे अप्लिकेशन बनविताना पोलीस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे.
ठळक मुद्देपोलिसांकडून वापर : चालता-फिरता गुन्हेगारांची माहिती