रविवारपासून प्रारंभ : प्रशासन व सामाजिक संघटनांचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहराचे तापमान प्रत्येक वर्षी डिग्रीने वाढत आहे. मानवाने नैसर्गिक प्रक्रियेत गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप केल्याचे दुष्यपरिणाम तापमान वाढीच्या स्वरूपातून दिसून येत आहे. निसर्गचक्र सुरळीत करण्यासाठी मानवालाच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ही गरज ओळखून वैद्यकीय जनजागृती मंच या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने महावृक्षारोपण हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याकरिता होणाऱ्या महाश्रमदानात वर्धेकरांनी सहभाग घेऊन शहराचे तापमान कमी करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. येत्या २८ मे रोजी सकाळी ६ ते ९ यावेळेत हनुमान टेकडी परिसरात महाश्रमदानाने उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. आर्वी तालुक्यात नुकतीच वॉटर कप स्पर्धा पार पडली. यात जिल्ह्यावासियांनी श्रमदान करून आपला सहभाग नोंदविला होता. त्यानुसार महावृक्षारोपण उपक्रमात नागरिकांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षारोपण व संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात येणार आहे. हनुमान टेकडी परिसरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही लोकोपयोगी मोहीम राबविण्यात आली आहे. यातून टेकडीवर १.५ कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण केले जाणार आहे. तसेच प्रशासनाकडून झालेल्या सर्व्हेक्षणात परिसरातील विहिरीच्या पातळी १.५ लिटर फुटांनी वाढ झाल्याची माहिती आहे. यासह टेकडी हिरवीगार करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापुर्वी व्हीजेएमने येथे ७१४ वृक्षांचे रोपण करून संवर्धन केले आहे. ही मोहीम आता विस्तारित करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहराच्या वाढत्या तापमानाचा नियंत्रित ठेवण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शहराच्या वाढत्या तापमानाला नियंत्रित ठेवण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शासनाने वैद्यकीय जनजागृती मंचच्या उपक्रमाची दखल घेत टेकडी परिसरात १० हजार रोपटे लावण्याचा निर्धार केला. यात जिल्हाधिकारी कार्यालयाचा सहभाग असणार आहे. येत्या रविवारी वनविभाग, वर्धा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वैद्यकीय जनजागृती मंच तसेच सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने १० हजार वृक्ष लावायचे आहे. वाढत्या तापमानाचा नियंत्रित ठेवणे आणि पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुट दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.
वर्धेचे तापमान एक डिग्रीने कमी करण्यासाठी ‘महावृक्षारोपण’
By admin | Published: May 27, 2017 12:27 AM