लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तारासावंगा येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक मारोतराव देशभ्रतार यांना रमाई आवास योजनामधून घरकुल मंजुर झाले. यासाठी त्यांना अनुदानाचे तीन टप्पे मिळाले. मात्र अंतीम टप्प्याचे वेळी ग्रामसेवकाने व चपराशाने खोडा घातल्याने त्यांना हक्काचे अनुदानापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. याप्रकरणी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.देशभ्रतार यांना १ लक्ष २० हजार व शौचालयाचे १८ हजार असे एकूण १ लक्ष ३८ हजाराचे अनुदान मंजुर झाले होते. यामधील तीन टप्प्याचे मिळून १ लाख रूपये त्यांना अदा करण्यात आले. त्यानंतर अंतिम टप्प्याचे अनुदान देण्यासाठी ग्रामसेवकाकडून बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र पाहिजे. यासाठी त्यांनी ग्रामसेवक चंदू चोपडे यांच्याकडे वारंवार मागणी केली. मात्र ग्रामसेवकाने सरपंचाकडे बोट दाखवून काढता पाय घेतला. त्यानंतर ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी जितेंद्र चक्रपाणी याने घराच्या बांधकामावर आक्षेप असल्याची तक्रार करून अतिक्रमण केल्याचे सांगितले. प्रत्यक्षात पाहणी झाल्यावर कुठेही अतिक्रमण दिसून आले नाही.शौचालय बांधकामाचे १८ हजाराचे मजुरी मस्टर काढण्यासाठी रोजगार सेवक संजय भारसाकळे यांनी ५०० रूपयाची मागणी केली. बांधकाम होवून सुध्दा एकही मस्टर काढण्यात आले नाही. शासनाच्या अधिकाºयानीच अडवणूक केल्याने घरकुल बांधकाम करूनही मनस्ताप सहन करावा लागत असल्याची खंत मारोतराव यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. ग्रामपंचायत कर्मचारी राजकारण करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करून घरकुलाचा अंतिम हप्ता व शौचालय अनुदान देण्याची मागणी देशभ्रतार यांनी केली आहे.प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटमरमाई आवास योजनेच्या घरकुलाचा अंतिम धनादेश १५ दिवसात न काढल्यास पंचायत समिती समोर उपोषण करण्याचा इशारा देशभ्रतार यांनी दिला आहे. पंचायत समितीचे अधिकारी ग्रामसेवकाला पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तीन हप्ते बरोबर दिले. चौथ्या हप्त्यालाच खोडा घातला आहे.बांधकामादरम्यान तक्रार आल्याने अंतिम हप्ता थांबविण्यात आला आहे. त्यामुळे चौकशी करून निर्णय घेण्यात येईल. मी कुठलेही राजकारण करीत नाही.- चंदू चोपडे, ग्रामसेवक, तारासावंगा.पंचायत समितीला तक्रार प्राप्त झाली आहे. मी स्वत: पाहणी करून लाभार्थ्याला अंतिम टप्पा द्यायला लावणार. पाणीपुरवठा कर्मचारी याचीही चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणार.- प्रशांत मोहोड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आष्टी (शहीद).
घरकुलाचा अंतिम हप्ता देण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 10:08 PM
तारासावंगा येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक मारोतराव देशभ्रतार यांना रमाई आवास योजनामधून घरकुल मंजुर झाले. यासाठी त्यांना अनुदानाचे तीन टप्पे मिळाले. मात्र अंतीम टप्प्याचे वेळी ग्रामसेवकाने व चपराशाने खोडा घातल्याने त्यांना हक्काचे अनुदानापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.
ठळक मुद्देचपराशी, ग्रामसेवकाची मिलीभगत : रोजगार सेवकाने मागितले पैसे