शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

नोंदणीकृत गवंडी कामगारांना मिळणार घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 11:48 PM

प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे म्हणून केंद्र शासनाने जून २०१५ मध्ये सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली.

ठळक मुद्देशासन आदेश जारी : कृती समिती व आमदारांचा पाठपुरावा; दोन लाख रुपयांची अतिरिक्त मदत

प्रशांत हेलोंडे ।आॅनलाईन लोकमतवर्धा : प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे म्हणून केंद्र शासनाने जून २०१५ मध्ये सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. याच अंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने ३ फेबु्रवारी रोजी शासन आदेश जारी केला आहे. यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सर्व मुलभूत सुविधायुक्त घरकूल उपलब्ध करून देण्याचे आदेशित करण्यात आले आहे.प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्रतेचे निकष पूर्ण करणाºया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना तथा अशा कामगारांच्या पात्र गृहप्रकल्पांना मंजुरी देण्यात येणार आहे. सदर कामगारांच्या पात्रता निश्चितीबाबत कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित मंडळ व कामगार विभागाची राहणार आहे. कामगार विभागाने निश्चित केलेल्या पात्र लाभार्थ्यांना व गृहप्रकल्पांना शासन निर्णयानुसार तथा राज्य शासनाने वेळोवेळी प्रधानमंत्री आवास योजनेकरिता लागू केलेल्या सवलती देण्यात येणार आहे. शिवाय पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून प्रती लाभार्थी २ लाख रुपये अतिरिक्त अनुदान देण्यासही कामगार विभागाने मान्यता दिली आहे. म्हाडासाठी अनुज्ञेय २.५ चटई क्षेत्रफळ एफएसआय केवळ १०० टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या घरकूल प्रकल्पांना व प्रधानमंत्री आवास योजनेच्या विहित कालावधीकरिताच राहणार आहे.घरकूल योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. यात महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत लाभास पात्र गृहनिर्माण प्रकल्प, महारेरा अधिनियम २०१६ अंतर्गत नोंदणीकृत असावा. लाभार्थी कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत व योजनेंतर्गत पात्र असावा. पात्र कामगाराला कोणत्याही नोंदणीकृत प्रकल्पातील घरकूल योजनेत सहभागी झाल्यास मंडळाकडून देय दोन लाख रुपये अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागामार्फत निर्गत या आदेशामुळे बांधकाम कामगारांना हक्काचे घर उपलब्ध होणार आहे.समिती व आमदाराचा पाठपुरावानोंदणीकृत बांधकाम कामगारांना हक्काचे घर मिळावे म्हणून बांधकाम कामगार संयुक्त कृती समिती व आ.डॉ. पंकज भोयर यांनी पाठपुरावा केला होता. इतरांची घरे बांधणारा बांधकाम मजूर आजही झोपडपट्टीत वा नाल्या शेजारी राहतो. याबाबत बांधकाम कामगार संयुक्त कृती समिती व आ.डॉ. भोयर हे बांधकाम कामगाराला हक्काची घरे मिळावी म्हणून दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्ह्यात २० हजारांच्या जवळपास नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे. पैकी पात्र कामगारांना योजनेचा लाभ मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.