आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये नाफेड पीएसएस अंतर्गत तूर खरेदीचा शुभारंभ समितीचे सभापती हिम्मत चतुर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष सुरेंद्र कुकेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमादरम्यान शेतकरी रामकृष्ण बोरकर व घनश्याम भुर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. नाफेडला तूर विकण्यासाठी आतापर्यंत १४९ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केलेली आहे. जास्तीत जास्त शेतकºयांनी तूर विक्रीकरिता आॅनलाईन नोंदणी करावी, असे याप्रसंगी सांगण्यात आले.शेतकºयांनी आपला शेतमाल चाळणी करुन तसेच वाळवून आणि शासकीय निकषानुसार स्वच्छ करून विक्रीकरिता आणावा, असेही यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश झोटींग, जनार्धन हुलके, वसंता महाजन, गंगाधर हिवंज, भोजराज दळणे, खरेदी विक्री संघाचे संचालक चांगदेव मुंगल, हरी बोबले, शांतीलाल गांधी, भारत भोयर, केशव भोले, कवडू मुडे, राम चौधरी, अरुण बकाल, दिलीप सोनटक्के, विनोद वांदिले, खुशाल लोहकरे, खेमराज पिचकाटे, लक्ष्मण मोते, अतुल पिचकाटे, जिवतोडे, म्हस्के, अतुल चौधरी, धोटे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाºयांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.
नाफेडला तूर विक्रीसाठी १४९ शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:19 PM
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये नाफेड पीएसएस अंतर्गत तूर खरेदीचा शुभारंभ समितीचे सभापती हिम्मत चतुर यांच्या हस्ते करण्यात आला.
ठळक मुद्देसभापतींच्या उपस्थितीत खरेदीचा शुभारंभ