लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात विज्ञान विषयात शिक्षण झालेल्या शिक्षकांना गणित व विज्ञान शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात येत आहे. ही पदोन्नती देताना भाषा व समाजशास्त्र विषयाच्या शिक्षकांना पदावनत केले जात आहे. यात त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करीत शिक्षक संघाने जि.प. अध्यक्षांच्या कक्षात बैठक घेतली. या बैठकीत कोणत्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही, याची दक्षात घेत झालेले सुपदेशन रद्द करून पुन्हा समुपदेशन करीत पुनर्पदस्थापना करावी, असे आदेश दिले.या आदेशावरून जि.प. मुख्य कार्यपाल अधिकाऱ्यांनी पत्र काढून शिक्षकांवरील अन्याय टाळण्याच्या सूचना करीत पुनर्पदस्थापना करावी, असे आदेश निर्गमित केले. तत्सम पत्र आठही पं.स. गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे नव्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.पूर्वीच्या पत्रानुसार, अतिरिक्त असलेल्या समाजशास्त्र विषय शिक्षकांचे सहायक शिक्षक पदावर पदावनतीकरिता इच्छुक शिक्षकांचे अर्ज मागविण्यात आले होते; पण अर्जानुसार कार्यवाही केल्यानंतर काही शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी सेवा-ज्येष्ठतेनुसार सामाजिक शास्त्र विषय शिक्षकांची समुपदेशनाद्वारे पदस्थापना करून त्यानंतर भाषा विषय शिक्षकांची रिक्तपदे समुपदेशनाद्वारे भरून उर्वरित शिक्षकांना त्याच शाळेत सहायक शिक्षक पदावर पदावनात करण्याचे ठरविण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांच्या कक्षात शिक्षक संघटनेच्या सभेत या विषयावर चर्चा झाली. चर्चेअंती कार्यरत भाषा व समाज शास्त्र (२५ टक्के मधील पदवीधर शिक्षक वगळून) विषय शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करून त्याप्रमाणे प्रथम भाषा विषय शिक्षकांची समुपदेशानाने नियुक्ती द्यावी व त्यानंतर सामाजिक शास्त्र विषय शिक्षकांचीही समुपदेशनाने रिक्त जागा भराव्या, असा निर्णय झाला.सदर पत्रान्वये (देवळी पं.स. वगळता) कर्मचाऱ्यांची माहिती तपासून तसेच काही कर्मचाऱ्यांचे नाव यादीतून सुटले असल्यास तशी नोंद घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.माहिती सादर करण्याचे आदेशआंतर जिल्हा बदली असल्यास तशी नोंद घेत भाषा व सामाजिक शास्त्र विषयाबाबत मंजूर पदांची माहिती ५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता न चुकता सादर करावी. ज्या पं.स. ची माहिती विहित मुदतीत सादर होणार नाही, त्या पं.स. चे संबंधित लिपिक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले.
भाषा, समाजशास्त्र विषय शिक्षकांची पुनर्पदस्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 10:41 PM
जिल्ह्यात विज्ञान विषयात शिक्षण झालेल्या शिक्षकांना गणित व विज्ञान शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात येत आहे. ही पदोन्नती देताना भाषा व समाजशास्त्र विषयाच्या शिक्षकांना पदावनत केले जात आहे.
ठळक मुद्दे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आदेशावरून निघाले पत्र