आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांची वीज बिलातून मुक्तता करा, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा, कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा द्या, कपाशीवरील गुलाबी, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना त्वरित २० हजार रुपये एकरी मदत करा, नान एफएक्यू प्रतीच्या सोयाबीनची आधारभूत किंमत त्वरित जाहीर करून शासकीय खरेदी सुरू करा आदी मागण्या शेतकरी संघटनेने केल्या. यासाठी मोर्चा काढून तहसीदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.हिंगणघाट तालुक्यातील शेतकरी संघटनेच्यावतीने दीपाली मंगल कार्यालयात युवा परिषद घेण्यात आली. परिषदेला विदर्भवादी नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष शैलजा देशपांडे, माजी राज्य कार्यकारिणी सदस्य मधुसुदन हरणे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, जि.प. सदस्य ज्योती निकम, माजी जि.प. सदस्य चंद्रमणी भगत, गजानन निकम, निळकंठ घवघवे, ग्राहक पंचायतचे डॉ. नामदेव बेहरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल धनवट यांनी शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेगाव येथे होणाºया मेळाव्याला लाखोंच्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन केले. माजी आमदार सरोज काशीकर यांनी समुद्रपूर-हिंगणघाट हे एकेकाळी शेतकरी संघटनेचे बालेकिल्ले होते. आज मला ते सर्व कार्यकर्ते येथे दिसत आहे. यापुढील सर्व आंदोलने आणि दिलेले आदेश योग्यरित्या पाळले जातील, याचा मला विश्वास आहे. शेतकºयांना यापूढे शेतमालाचे योग्य भाव मिळविण्यासाठी सर्वांनी एकजुट होऊन आपल्या मागण्या पदरात पाडता येतील, असे सांगितले. अॅड. चटप यांनी वेगळे विदर्भ राज्य झाल्याशिवाय शेतकºयांचे भले होऊ शकत नाही. म्हणून शेतकºयांनी वेगळ्या विदर्भासाठी ताकदीने उभे राहावे, असे आवाहन केले.युवा परिषदेत जिल्हा महिला आघाडी शेतकरी संघटना अध्यक्षपदी जि.प. सदस्य ज्योती निकम, जिल्हा युवा आघाडी अध्यक्षपदी अरविंद राऊत, उपाध्यक्ष युवा आघाडी पदी गणेश मुटे यांची नियुक्ती करण्यात आली. युवा परिषदेला जाताना नेत्यांना मोटार सायकल रॅलीने वाघेडा चौक ते दिपाली मंगल कार्यालयापर्यंत नेण्यात आले. सभेनंतर मोर्चाद्वारे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यात बाजारातील शेतकºयांची लूट थांबविण्यासाठी कृषी मालाची ए, बी, सी अशा तीन ग्रेडची आधारभूत किंमत जाहीर करावी. मागील वर्षी जाहीर केलेली सोयाबीनची २०० रुपये प्रती क्विंटलचे अनुदान त्वरित वितरित करावी. वीज बिल थकबाकीपोटी कृषी पंपाजी जोडणी खंडित करू नये. वन्यप्राणी कायद्यात साप या प्राण्याचा समावेश करून सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे होणाºया नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनाचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी डॉ. हेमंत इसनकर, अजाब राऊत, जीवन गुरनुले, शेषराव तुळणकर, दिनेश निखाडे, केशव भोले, भाऊराव गाठे, प्रवीण महाजन, सचिन डोफे, तुकाराम थुटे, शंकर गुरनूले, चिंतामण राऊत, किसना शेंडे, हनुमंत राऊत, सुखदेव पाटील, विजय ठाकरे, पुंडलिक हुडे, अंकुश चेरे, सुनील हिवसे आदी उपस्थित होते.