लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत मोबाईल मिसींग बाबतच्या तब्बल १०१२ च्यावर तक्रारी सायबर सेल विभागाच्या पोलिसांना प्राप्त झाल्या. त्यापैकी ३०५ नागरिकांना त्यांचा मोबाईल परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. इतकेच नव्हे तर वर्धा पोलिसांच्या या विशेष चमूने २३ मोबाईल चोरट्यांना हुडकून काढत त्यांना अटक केली आहे.तक्रार प्राप्त होताच अवघ्या काही दिवसांत मोबाईलचा शोध लावल्या जात असल्याने नागरिकांचा विश्वास संपादित करण्यात पोलिसांचा हा विभाग अव्वल ठरू पाहत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात जबरी मोबाईल चोरी बाबत आठ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा गुन्ह्यांचा झडा लावत एकूण १० आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दोन मोबाईल ट्रेस झाले नसून त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे.तसेच घरफोडी बाबतची ११ गुन्हे दाखल झाली. त्यापैकी चार गुन्हे उघडकीस आणत ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चोरी बाबतचे ३१ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी १० गुन्हे उघडकीस आणून १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर २१ गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे वर्ष २०१९ मध्ये मोबाईल मिसींग बाबतच्या एकूण १०१२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ३०५ तक्रारदारांना त्यांचा हरविलेला मोबाईल परत करण्यात पोलिसांना यश आले आहे.नवीन मोबाईल घेऊन जाणाऱ्या कंटेनरमधील विविध कंपन्यांचे मोबाईल चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार प्राप्त होताच कारंजा (घा.) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेलच्या पोलिसांनी केला. इतकेच नव्हे तर गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात सायबर सेलच्या चमूने या प्रकरणातील आरोपीला हुडकून काढत त्याच्याकडून तब्बल ९१ मोबाईल जप्त केले. २०१९ या वर्षात सदर गुन्ह्याचा छडा लावताना सायबर सेलने केलेली कामगिरी उल्लेखनीयच ठरल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल चोरट्यांना हुडकून काढल्या जात आहे. इतकेच नव्हे तर मोबाईल ट्रेस झाल्यावर त्याच्यावर करडी नजर ठेवली जाते. शिवाय अवघ्या काही तासात चोरट्यालाही जेरबंद केले जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
३०५ मोबाईलधारकांना ‘सायबर सेल’चा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 6:00 AM
तक्रार प्राप्त होताच अवघ्या काही दिवसांत मोबाईलचा शोध लावल्या जात असल्याने नागरिकांचा विश्वास संपादित करण्यात पोलिसांचा हा विभाग अव्वल ठरू पाहत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात जबरी मोबाईल चोरी बाबत आठ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा गुन्ह्यांचा झडा लावत एकूण १० आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दोन मोबाईल ट्रेस झाले नसून त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे.
ठळक मुद्दे२३ चोरट्यांना ठोकल्या बेड्या। विश्वास संपादनात ठरतेय अव्वल