लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : मागील काही दिवसांमध्ये पावसाने कोल्हापूर, सांगली भागात अक्षरश: थैमान घातले आणि कष्टाने उभे केलेले संसार क्षणात होत्याचे नव्हते झाले. या महापुरात सांगली, कोल्हापूर येथे अनेक संसार ध्वस्त झालेत. होत नव्हतं सगळं या पुरात वाहून गेलं. कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले. पण याही परिस्थितीत त्यांचा संघर्ष चालूच आहे. आज संबंध महाराष्ट्र सांगली,कोल्हापूर वासींयासाठी एकत्र आलायङ्घचला तर मग आपण ही आपला वाटा उचलूया, शक्य ती मदत करूया..तुमची मदत कुणाला तरी जगण्याला बळ देईल याला प्रतिसाद म्हणून तळेगावातील तरुणांनी मदतफेरी काढून काही रोख रक्कम व अन्नधान्याच्या स्वरूपात मदत गोळा केली.तळेगाववासीयांनीसुद्धा या पवित्र कामाकरिता सढळ हाताने मदत केली. ही मदत सांगली, सातारा, कोल्हापूर येथे पाठवण्यात आली. याकरिता प्रामुख्याने आशीष खंडागळे, रवींद्र कोहळे, संकेत जाचक, योगेश श्रीराव, हर्षल बन्नगरे, गोलू लोखंडे, गौरव महाडिक, रूपेश देवघरे, अभिजित इंगळे, महेश महाडिक व तळेगावातील विविध सामजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी याकरिता मोलाचे सहकार्य केले.
सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदतफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:36 PM
मागील काही दिवसांमध्ये पावसाने कोल्हापूर, सांगली भागात अक्षरश: थैमान घातले आणि कष्टाने उभे केलेले संसार क्षणात होत्याचे नव्हते झाले. या महापुरात सांगली, कोल्हापूर येथे अनेक संसार ध्वस्त झालेत. होत नव्हतं सगळं या पुरात वाहून गेलं. कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले.
ठळक मुद्देगावागावांत तरुणाईचा पुढाकार : रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला