लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राज्य सरकारने लोकसहभागातून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. याच कार्यक्रमांतर्गत गाव-शहरातील मोकळ्या मैदानात आॅक्सिजन पार्कच्या निर्मितीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) या गावातही आॅक्सिजन पार्क असा मोठा फलक लावण्यात आला. परंतु, गंमत अशी की, या ठिकाणी केवळ फलकच आहे.झाडे कुठेही नाही. पर्यावरण संवर्धन संस्थेचे गौरव जामुनकर यांच्या निदर्शनास ही बाब येताच संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर व गौरव जामुनकर यांनी या जागेची पाहणी केली. तेव्हा ६.८८ क्षेत्रफळात ४७० झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याचे समजले. सत्यता जाणून घेण्याकरिता सरपंच कापसे यांची भेट घेतली. याविषयी कुठलीच माहिती नसल्याने ग्रामपंचायतीमध्ये जाण्यास सांगितले. तिथेही सगळे कर्मचारी अनभिज्ञ होते. त्या जागेवर गिट्टी खदान आहे, वरून तार गेलेली आहे, अशी कारणे सांगितली. परंतु ही जागा झुडपी जंगल क्षेत्राकरिता अधिसूचित करण्यात आलेली असताना अशा अडचणी का येत आहे, अशी विचारणा केली असता कर्मचाºयांकडे उत्तर नव्हते. त्यांनी पंचायत समितीकडे विचारणा करण्यास सांगितले. आमदारांशी चर्चा केली असता त्यांनी गटविकास अधिकारी यांना भेटण्यास सांगितले. पंचायत समिती कर्मचारी सायंकार यांना माहिती विचारली तेव्हा त्यांनाही कुठलीच कल्पना नसल्याचे समजले. प्रत्येक विभागाने हा विषय दुसºया विभागावर ढकलण्याचे काम केले. हा फलक कुणी लावला, हे ग्रामपंचायत, पंचायत समिती, वनविभाग कुणालाही माहीत नव्हते.दोन दिवसांत याविषयी सविस्तर माहिती देऊ, असे सचिव भोमले यांनी सांगितले. परंतु, या फलकावर गटविकास अधिकारी पंचायत समिती असे नाव असल्याने त्यांच्या सांगण्यावरून किंवा परवानगीने लावण्यात आला असावा. परंतु, या विभागाने ही जबाबदारी नाकारली. या आॅक्सिजन पार्कचा पाठपुरावा घेत राहू, असे संस्थेचे आशिष भोयर यांनी सांगितले. ५० कोटी वृक्ष हा आकडा थोडाथोडका नाही. परंतु, अशाप्रकारच्या भोंगळ कारभारामुळेच झाडे केवळ फलकांवर व कागदावरच लावली जातात आणि उद्दिष्टपूतीर्ची घोषणा केली जाते. मागीलवर्षी १३ कोटी, तर यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. झाडे केवळ फलकांवरच लावण्यात येणार असल्यास हेही उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होणार, यात शंका नाही. मात्र, अशा कोट्यवधी वृक्षलागवडीचे तीनतेरा झाले असताना विकासाच्या नावावर सुरू असलेली कोटी वृक्षांची वारेमाप कत्तल बघता जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण होत आहे.हा फलक पंचायत समितीने लावलेला नसून तो वनविभागाने लावला असावा, अद्याप आॅक्सिजन पार्कला मंजुरी मिळालेली नसून प्रकल्प प्रक्रियेमध्ये आहे.- अशोक खाडे,गटविकास अधिकारी,
फलक उरला नावापुरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:38 PM
राज्य सरकारने लोकसहभागातून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. याच कार्यक्रमांतर्गत गाव-शहरातील मोकळ्या मैदानात आॅक्सिजन पार्कच्या निर्मितीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) या गावातही आॅक्सिजन पार्क असा मोठा फलक लावण्यात आला.
ठळक मुद्देवृक्षलागवड उद्दिष्टपूर्तीचे तीनतेरा : प्रशासकीय अधिकाऱ्यांची सारवासारव