ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांच्या शेतमालाला वन्यप्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर त्रास आहे. या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी वर्धा येथील तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट अॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अंत्यत कमी खर्चात शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करणारी ही यंत्रणा शेतीसाठी लाभदायक ठरणारी आहे. नागपूर येथे झालेल्या विभागीय तंत्र प्रदर्शनात या यंत्रणेची दखल घेऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. आता राज्यस्तरावर ही यंत्रणा प्रदर्शनासाठी पाठविली जाणार आहे.शेतकऱ्यांवर अस्मानी संकटासोबतच वन्यप्राण्यांपासून शेतमालाचे नुकसान होण्याच्या संकट येते. अनेकवेळा माकडे, रानडुकर, पक्षी आदी शेतमाल उपडून फेकून देतात. त्यामुळे शेतकरी कमालीचा त्रस्त होतो. ही बाब यातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी या उद्देशाने आयअीआयतील विद्यार्थ्यांनी स्मार्ट अॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टमी प्रणाली विकसित केली आहे. या माध्यमातून रात्री दिवसा वन्यप्राण्यांपासून शेतामालाचा बचाव करता येणार आहे.शेतात दिवसा माकडांच्या टोळ्या फिरतात. तसेच नुकतेच पेरलेले बियाणे व हरभऱ्याचे दाणे टिपणाºया पक्ष्यांपासूनही बचाव करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही लाभदायक ठरणारी आहे. नागपूर येथे झालेल्या तंत्र प्रदर्शनात या प्रणालीचे अवलोकन करून तिची राज्यस्तरीय प्रदर्शनीसाठी निवड करण्यात आली आहे.काय आहे प्रणालीसिंगल फेज एसी सप्लाय तसेच इन्व्हर्टर बॅटरी किंवा सौर उर्जेवर चालण्यास सक्षम असणारी ही प्रणाली आहे. यामध्ये संपूर्ण शेताला कुंपण करण्याची आवश्यकता नाही. या प्रणालीच्या कक्षेत जंगली श्वापद आल्याबरोबर ते दूर पळविण्यासाठी स्वयंचलित प्रणाली पूर्णपणे आपोआप कार्यान्वित होते. हे या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यासाठी मोठ्या खर्चाची गरज नाही.
वन्यप्राण्यांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:22 PM
शेतकऱ्यांच्या शेतमालाला वन्यप्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर त्रास आहे. या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी वर्धा येथील तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट अॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
ठळक मुद्देराज्यस्तरावर होणार सन्मान : आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केली यंत्रणा