प्रभाकर शहाकार।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : येथे दोन वर्षांपूर्वी भयानक अग्निस्फोटात दारूगोळा भांडारातील अधिकाऱ्यांसह १९ जवानांनी या अग्निस्फोटात आपल्या प्राणाची आहूती दिली. लाखो लोकांचे प्राण वाचविले. आज या घटनेला दोन वर्षांचा काळ लोटला. परंतु, त्या घटनेतील जखमा आजही ताज्या आहेत. पुन्हा त्या काळरात्रीचे स्मरण नको म्हणून शहर व परिसरातील हजारो नागरिकांनी अश्रू टिपत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शहीदांचे स्मरण केले.घटनेच्या दिवशी लागोपाठ होणारे बॉम्ब स्फोटाचे आवाज आकाशाला भिडणाºया आगीच्या ज्वाळा धुराचे डोंबर पहात शहर व परिसरातील रस्त्याने सैरावैरा धावत होते. दारूगोळा भांडाराला लागून असणारे पिंपरी (खराबे), आगरगाव, नागझरी, एसगाव, मुरदगाव, सोनेगाव येथील ग्रामस्थ घरदार सोडून रस्त्यावर आले. अखेर भयभीत झालेल्या ग्रामस्थांना खा. रामदास तडस यांनी मिळेल. त्या वाहनाने देवळी, नाचणगाव येथे हलविले. बॉम्ब स्फोटाचे कर्णभेद आवाज व ग्रामस्थांचा हलकल्लोळ अशा द्विधा मनस्थितीत असताना त्यांनी नागरिकांना धीर दिला. ग्रामस्थांची देवळी व नाचणगाव येथे राहण्याची व्यवस्था केली. शहर व ग्रामीण भागात धावपळ सुरू असतानाच दारू गोळा भांडारातील लष्करी, निर्मलष्करी व अग्निशमक दलातील कर्मचारी जीव मुठीत घेवून या भयावह अग्निस्फोटाचा सामना करीत होते. भांडारातील वीर जवान भयानक अग्निस्फोट व कर्णभेदी आवाजातही भांडारातील इतर ठिकाणचा दारूगोळा या घटनास्थळापासून सुरक्षित स्थळी हलवून शहर व परिसरातील ग्रामस्थ कसे सुरक्षित राहील याचा विचार करून अग्निस्फोटावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होते; पण भयंकर शक्तीशाली स्फोट व वाºयामुळे पसरणारी आग यामुळे अग्निशामक दलाच्या दोन गाड्या कर्मचाºयासह फुटबॉल सारख्या उडाल्या. तरीही दारूगोळा भांडारातील अधिकारी व वीर जवानांनी देशभक्ती व आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय देत आपल्या प्राणाची आहूती देत अनेकांचे प्राण वाचविले. या अग्निस्फोटात लष्करी अधिकाºयासह अग्निशमन दलातील १९ जवानांनी बलिदान दिले. १९४२ साली सुरू झालेल्या या केंद्रीय दारू गोळा भांडारात शहर व परिसरातील कर्मचाºयांचे मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्यामुळे बॉम्बस्फोट झाल्यापासून शहरवासियांची शोधाशोध व विचारणा सुरू झाली. अग्निस्फोटाने संपूर्ण सैनिकी प्रशासन हादरून गेले होते. सगळ्यांच लक्ष एकच, अग्निस्फोटावर नियंत्रण मिळविणे. दिवस निघता निघता अग्निस्फोटावर नियंत्रण तर मिळविले. परंतु ‘गड आला पण सिंह गेला’ म्हणत दोन सैनिकी अधिकाऱ्यांसह १९ कर्तबगार जवानांना वीरगती प्राप्त झाली. साºया देशाने या घटनेची नोंद घेतली. आजही त्या आठवणी जाग्या झाल्यावर भयानक दृष्य डोळयासमोर उभे राहते. पुन्हा अशी घटना घडू नये अशीच प्रार्थना या घटनेनंतर साºया समाजाने नोंदविली. अनेक जण आजही बोलता बोलता सहज म्हणतात ‘नको त्या काळ रात्रीची आठवण’.
पुन्हा नको दारूगोळा भंडारातील ‘त्या’ काळरात्रीचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:05 PM
येथे दोन वर्षांपूर्वी भयानक अग्निस्फोटात दारूगोळा भांडारातील अधिकाऱ्यांसह १९ जवानांनी या अग्निस्फोटात आपल्या प्राणाची आहूती दिली. लाखो लोकांचे प्राण वाचविले. आज या घटनेला दोन वर्षांचा काळ लोटला. परंतु, त्या घटनेतील जखमा आजही ताज्या आहेत. पुन्हा त्या काळरात्रीचे स्मरण नको म्हणून शहर व परिसरातील हजारो नागरिकांनी अश्रू टिपत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शहीदांचे स्मरण केले.
ठळक मुद्देदिन विशेष : शहिदांना देशभक्तीपर गीतातून भावपूर्ण श्रद्धांजली