शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 11:59 PM

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नगर पालिकेत २२६ रोजंदारी कर्मचारी जे १९८२ पासून सेवेत आहेत त्यांना सेवेत कायम करण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालून त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून निकाली काढू असे आश्वासन वर्धा जिल्हा नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला आ. समीर कुणावार यांनी दिले.यावेळी त्यांनी सेवेत कायम होईपर्यंत सध्या असलेल्या ...

ठळक मुद्देसमीर कुणावार : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नगर पालिकेत २२६ रोजंदारी कर्मचारी जे १९८२ पासून सेवेत आहेत त्यांना सेवेत कायम करण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालून त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडून निकाली काढू असे आश्वासन वर्धा जिल्हा नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला आ. समीर कुणावार यांनी दिले.यावेळी त्यांनी सेवेत कायम होईपर्यंत सध्या असलेल्या ४३० रूपये रोज किमान वेतनाप्रमाणे १ जानेवारी २०१७ पासून ५४८ रूपये करण्याबाबत नगराध्यक्ष, हिंगणघाट यांना सुचित करून वाढीव वेतन मिळवून देऊ असे आश्वासनही कर्मचारी संघटनेच्या शिष्ट मंडळास दिले. याप्रसंगी वर्धेचे नगरसेवक यशवंत झाडे यांनी आ. समीर कुणावार यांचा सत्कार केला.सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स सिटू अंतर्गत कार्यरत वर्धा जिल्हा नगर पालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने ४ जानेवारी २०१८ रोजी धरणे आंदोलन हिंगणघाट नगर पालिकेसमोर सकाळी १० ते ४ या वेळेत करण्यात आले. वाढीव मजूरी प्रती दिन ५४८ रूपये द्या, १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत प्रती दिवस ११८ रूपये वाढीव मजुरीचा एरीयस द्या, न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ज्यांचे निकाल लागले त्यांना सर्वप्रथम सेवेत कायम करा, रोजंदारी कर्मचाºयांची सेवानिवृत्ती वय ६० वर्षे करा, सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना २४ आॅगस्ट २०१७ चे मुख्यमंत्री महोदयांचे निर्देशाप्रमाणे सेवेत कायम करावे, आदी मागण्यांसाठी आंदोलन केले. याप्रसंगी झालेल्या सभेत युनियनचे अध्यक्ष यशवंत झाडे, चंद्रभान नाखले, सिताराम लोहकरे, भैय्या देशकर यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर सुनील घिमे, संजय भगत, राहुल खंडाळकर यांची उपस्थिती होती. यावेळी मागण्यांचे निवेदन हिंगणघाट नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल जगताप, नगराध्यक्ष पे्रम बसंतानी यांना देण्यात आले. शिष्टमंडळात यशवंत झाडे, सिताराम लोहकरे, भैय्या देशकर, अनिल झाडे, गर्वदास वासेकर, पुरूषोत्तम पार्लेवार, लिला चव्हाण, चंपा सौदे, चंपा तांबे यांचा समावेश होता. त्यानंतर या शिष्ट मंडळाने आ. समीर कुणावार यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.निवेदन देताना झालेल्या चर्चेअंती आमदार समीर कुणावार यांनी पालिकेतील कर्मचाºयांंच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू व सदर मागण्या पूर्णत्वास जाईपर्यंत पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी मोठ्या संख्येने नगर पालिकेतील कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.