लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराचे सौंदर्यीकरण झपाट्याने होत आहे. याच कामाच्यादरम्यान शहरातील वीज जोडणी भूमिगत करावी, अशी मागणी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना निवेदनातून केली. या मागणीला प्रतिसाद देत त्यांनी या कामाला तत्काळ प्रारंभ करण्याच्या सूचना दिल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.ना. चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी वर्धा शहरात विद्युत ग्राहक तक्रार निवारण कार्यक्रमाला आले होते. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी शहराच्या विकासाच्या दुष्टीकोनातून बॅचलर रोड, या रस्त्याचे नुतनीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू असता या रस्त्यामध्ये असलेला सर्व एलटी लाईन भूमिगत होत असताना एचटी लाईन सुद्धा अंडर ग्राऊंड करण्यात यावे, असे निवेदन दिले. वर्धा शहरातील संपूर्ण विद्युत पुरवठा, लाईन अंडरग्र्राऊंड करण्याकरिता १०६ कोटीचा डीपीआर तयार करण्यात आलेला आहे. परंतु हे करत असताना न.प. च्या पाणी पुरवठा करणाच्या पाईप लाईन अडथळे निर्माण करीत आहेत. तसेच केबल लाईन व पालिकेच्या माध्यमाने नियोजित कामांमध्ये कुठेच अथळा निर्माण होऊ नये व काम चांगल्या प्रकारे व्हावे याकरिता न.प.ला विश्वासात घेऊन काम करावे, अशी मागणी केली आहे.वर्धा शहराचा झपाटयाने विकास व्हावा सोबतच सौंदर्यीकरण व उर्जेची बचत होण्याकरिता शहरामध्ये एलईडी लाईट लावण्याकरिता नगर परिषदेला १ कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करावा अशी मागणीही नगराध्यक्ष तराळे यांनी केली आहे. उर्जा मंत्री यांनी अधिकाºयांना निर्देश देऊन सदर विद्युत वाहिनी तात्काळ भूमिगत करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, अनिल सोले, नागो गाणार, मितेश भांगडीया, रणजित कांबळे, अमर काळे, समीर कुणावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, सुनील गफाट, वरूण पाठक, पालिकेचे बांधकाम सभापती निलेश किटे, राखी पांडे, कैलाश राखडे, शुभांगी नरेश कोलते, आशिष वैद्य, सतीश मिसाळ यांच्यासह वर्धेचे संपूर्ण नगरसेवक व जिल्हा परिषद पदाधिकारी उपस्थित होते.
भूमिगत विद्युत वाहिनीचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 2:06 AM
शहराचे सौंदर्यीकरण झपाट्याने होत आहे. याच कामाच्यादरम्यान शहरातील वीज जोडणी भूमिगत करावी, अशी मागणी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना निवेदनातून केली.
ठळक मुद्देनगराध्यक्षांच्या प्रयत्नाला यश : उर्जामंत्र्याच्या सूचना; १०६ कोटींचा डीपीआर