लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवून वेळोवेळी सरकार द्वारे अन्याय करण्यात आलेला आहे. वर्ष २०१५-१६ व २०१६-१७ च्या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती पासून अनेक ओबीसी विद्यार्थी वंचित आहेत. यातील अडचणी दूर करून त्यांना त्वरीत शिष्यवृत्ती प्रदान करावी, अशी मागणी युवक क्रांती दलाच्यावतीने शुक्रवारी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.वर्ष २०१७ -१८ च्या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्यांना पहिले आॅनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. आता त्यात अचानक बदल करून आॅफलाईन पद्धतीने अर्ज मागितल्या जात आहे. विद्यार्थ्यांनी स्वखर्चातुन आॅनलाईन आवेदन भरले. पुन्हा आॅफलाईन आवेदनाकरिता त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महाविद्यालयीन शुल्का संदर्भात १०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर हमीपत्र विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक केले. यामुळे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्याअगोदर महाविद्यालय प्रशासन परीक्षेच्या पूर्वी आपले महाविद्यालयीन शुल्क विद्यार्थ्यांपासून वसूल करणार आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांना वेठीस धरणारा आहे. या बाबत योग्य त्या सूचना देवून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज निवेदनातून वर्तविण्यात आली आहे. वेळोवेळी सरकारद्वारे शिष्यवृत्ती संदर्भात नवनवे आदेश निर्गमित केल्या जात आहे. शैक्षणिक सत्र समाप्तीच्या वेळी शिष्यवृत्ती आवेदन प्रक्रिया आॅफलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अयोग्य वेळी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी व महाविद्यालय प्रशासन संभ्रमात आहे.शिष्यवृत्ती योजनेबद्दल सरकारची ही भुमिका निंदनीय असून भविष्यात शिष्यवृत्ती योजना बंद करण्याचे धोरण यातून स्पष्ट होताना दिसते. याचा ओबीसी युवक क्रांती दल निषेध करत आहे. शिष्यवृत्ती संदर्भात सरकारने धोरणात सुधारणा करण्याची गरज आहे. यापुढे शिष्यवृत्ती संदर्भात विद्यार्थ्यांना वेठीस धरल्यास ओबीसी युवक क्रांती दल तीव्र आंदोलनाचा इशारा ओबीसी युवक क्रांती दलाचे संयोजक तथा युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना विवेक तळवेकर, विवेक डेहनकर, सचिन हजारे, बशीर शेख, श्रीकांत पाटील, विरेंद्र उरकुडे, प्रतीक टेंभुर्णे, प्रतीक टेंभुर्णे, अपूर्व देशपांडे, मोहन जोशी, श्याम महाजन, शशांक कोटंबकार, उमेश देशमुख, सतीश लांबट उपस्थित होते.
शिष्यवृत्तीच्या आवेदनातील संभ्रम दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:25 PM
ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवून वेळोवेळी सरकार द्वारे अन्याय करण्यात आलेला आहे. वर्ष २०१५-१६ व २०१६-१७ च्या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती पासून अनेक ओबीसी विद्यार्थी वंचित आहेत. यातील अडचणी दूर करून त्यांना त्वरीत शिष्यवृत्ती प्रदान करावी, ...
ठळक मुद्देओबीसी विद्यार्थी अडचणीत : युवक क्रांती दल आंदोलन करणार