लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये पुढील हंगामात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट टाळण्यासाठी शेतातील पऱ्हाटी उपटल्यानंतर किमान पाच महिने शेत रिकामे असणे गरजेचे आहे. यासाठी शेतकºयांनी पुढील हंगामातील धोका टाळण्यासाठी पऱ्हाटी पूर्णपणे उपटून उपाययोजना करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.गुलाबी, शेंदरी बोंडअळीचा उद्रेक पाहता डिसेंबर महिन्यातच शेतातून पºहाटी काढणे आवश्यक होते. मात्र, काही शेतकरी मार्च-एप्रिल पर्यंत शेतात पऱ्हाटीची झाडे ठेवतात. बोंडअळीचे जीवनचक्र ३० ते ३५ दिवसातच पूर्ण होते. साधारणत: जुन महिन्यातच पऱ्हाटीची लागवड केली जाते. जुन ते डिसेंबर या कालावधीत बोंडअळीचे पाच ते सहा जीवनचक्र पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पुढील हंगामात पऱ्हाटीची लागवड करायची असल्याची आधीची बोंडअळी पूर्ण नष्ट करावी लागेल. यासाठी पऱ्हाटी उपटून फेकावी लागेल. उपटलेली पऱ्हाटीची झाडे शेतातील मातीवर ठेवू नये. मुळसकट उपटून त्याचाबारीक चुरा करावा. सेंद्रीय खत तयार करण्यासाठी ढीग तयार करावा. त्यालासाध्या मातीचे लीपण लावून बंद करावे. जर जिथे बोंडअळीचे अंडे शिल्लक असेल तर आतील तपामानामुळे ते मरतील. पुढच्या हंगामासाठी नांगरणी करायची असल्यास एक महिन्याआधी करावी. नागरणी करताना कोष वेचता येईल किंवा पक्ष्यांना खाता आले पाहिजे, असे करावे.मोसमाच्या वेळची पद्धतगुलाबी बोंडअळी हा एक लपून बसणारा किटक आहे. म्हणून अळीमुळे होणारे नुकसान बोंड उघडेपर्यंत दिसून येत नाही. त्यामुळे पिकाच्या संरक्षणासाठी जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी फेरोमोन ट्रॅप्स १२ ट्रॅप्स एकर या प्रमाणे वापरून किटकाच्या वाढीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. रोझेट फ्लावर्स (किडीमुळे पाकळ्या बंद केल्या जाणे) यावर लक्ष ठेवले पाहिजे. (एक रोझेट फ्लॉवर १० फुलांमध्ये), १० बोंडामध्ये एक जीवंत अळी (१० टक्के बाधित बोंडे) जैविक एजंटचा उपयोग करण्यासाठी ट्रायकोग्रामा ६० प्रति एकर याप्रमाणे ३ वेळा, १५ दिवसांच्या अंतराने, पिकाला फुले येणाºया टप्प्यात वापरावे. किडीमुळे पाकळ्या बंद झालेली फुले नष्ट करून टाकावित व खाली पडलेल्या पात्या, वाळलेली फुले आणि पूर्णपणे वाढ न झालेली बोंडे मधून मधून पाहणी करून काढून टाकावित यामुळे किडीची वाढ पहिल्या टप्प्यात रोखता येईल.नियंत्रण गरजेचेगुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन अवलंब करावा. किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ती लवकरात लवकर शोधून काढणे महत्वाचे आहे. कीड शोधण्याचे व नियंत्रणाचे काम नियमित केले पाहिजे. कीड शोधण्यासाठी व नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप्स बसवावा. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केलेल्या फवारणीच्या वेळापत्रकाप्रमाणे फवारणी करावी. पीक फेरपालट करावी. अंबाडी, भेंडी अशी पीके कपाशीपूर्वी किंवा नंतर घेऊ नयेत. त्यामुळे बोंडअळीच्या जीवनचक्रमात खंड पडेल. कपाशी मान्सूनपूर्वी लागवड करू नये तसेच फरदड घेऊन नये. कमी कालावधीचे आणि वेळी जवळपास वेचणी करता येणाºया संकरीत वाणांची लागवड करावी.एकात्मिक व्यवस्थापनगुलाबी बोंडअळी पुढील हंगामात पिकावर येऊ नये यासाठी शेताची स्वच्छता, कापसाच्या रोपांचे उरलेले भाग, वाळलेले किंवा न उघडलेली हिरवी बोंडे यांचा नाश करण्यासाठी ती खड्ड्यात पुरून टाकावित किंवा जाळून टाकावित. कापसाचा पिकावरील राहिलेला भाग ताबडतोब काढून टाकावा व नष्ट करावा म्हणजे हे किटक पुढच्या मोसमात या पिकावर हल्ला करणार नाहीत. किटकाच्या जीवनचक्रावर अडथळा आणण्यासाठी त्या जागेवर दुसरे पीक घ्यावे.
बोंडअळीचे संकट टाळण्यासाठी पºहाटी काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:12 AM
जिल्ह्यामध्ये पुढील हंगामात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट टाळण्यासाठी शेतातील पऱ्हाटी उपटल्यानंतर किमान पाच महिने शेत रिकामे असणे गरजेचे आहे.
ठळक मुद्देज्ञानेश्वर भारती : किमान पाच महिने शेत रिकामे असणे गरजेचे