ग्रामस्थांसह शेतकऱ्यांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क कन्नमवारग्राम : येथील कन्नमवार तलाव बनून ३० ते ३९ वर्षाचा कालाविधी झाला. ठरवलेल्या प्रमाणे १०-१५ वर्ष शेतकऱ्यांना ४ ते ५ वेळा पाणी मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू व चना पिकाचे उत्पादन घेता आले. परंतु, याच तलावातील गाळ न काढण्यात आल्याने पाण्याची पातळी कमी झाली आहे. याकडे लक्ष देत तलावातील गाळ काढण्याची मागणी आहे. पूर्वी मुबलग पाणी मिळत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यंदा पाण्याची पातळीच कमी झाल्याने सिंचनासाठी पाणी अल्प प्रमाणात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या तलावातील गाळ बऱ्याच वर्षांपासून काढण्यात आला नाही. तलावात पाण्याची पातळी बऱ्यापैकी असल्याचे दिसत असले तरी गत ३० वर्षाच्या काळात तलावात भरपूर गाळ साचला आहे. त्यामुळे सिंचनाचे क्षेत्रही घटले आहे. पूर्वी १४० ते १५० हेक्टर पर्यंत ओलीत होत होते. पण, आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी ३ ते ४ वेळाच पाणी मिळत आहे. पिकांना वेळीच पाणी मिळत नसल्याने उत्पादनातही घट येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची समस्य लक्षात घेत गाळ काढण्याची मागणी आहे.
कन्नमवारग्राम येथील तलावातील गाळ काढा
By admin | Published: May 14, 2017 12:52 AM