लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलगाव येथील जयभारत टेक्सटाईल्स मधील कामगारांच्या समस्या निकाली काढा, अशी मागणी प्रहार कामगार संघटनेच्यावतीने मिल प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीवर येत्या काही दिवसात विचार न झाल्यास ११ एप्रिलला एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना वेतन देण्यात यावे. स्थानिक कामगारांना नौकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावे. कामगारांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत अदा करण्यात यावे. कामगारांना आरोग्य विषयक सोयी-सुविधा देण्यात याव्या. कंपनीचा माल जर आला नाही तर कोणताही कामगार वापस जाणार नाही त्याला दुसऱ्या कोणत्याही विभागात काम देण्यात यावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.सदर मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा या हेतूने यापूर्वी १२ मार्चला मिल प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मात्र, अद्यापही त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने सोमवारी पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले. येत्या काही दिवसात निवेदनातून करण्यात आलेल्या कामगारांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास ११ एप्रिलला एक दिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना जुबेर अहमद, वैभव धांदे, तुषार कोंडे, महेश साहू, तुषार वाघ, शैलेश सहारे, बिट्टु रावेकर, भारत मुंजेवार, राजेश सावरकर, मधुकर नागापुरे, पवन ब्राह्मणकर, विजय सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
कामगारांच्या समस्या निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 11:16 PM
पुलगाव येथील जयभारत टेक्सटाईल्स मधील कामगारांच्या समस्या निकाली काढा, अशी मागणी प्रहार कामगार संघटनेच्यावतीने मिल प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
ठळक मुद्देमिल प्रशासनाला ‘प्रहार’चे निवेदनातून साकडे