लोकमत न्यूज नेटवर्ककन्नमवारग्राम : तलावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नदीवर पूल आहे. पावसामुळे सदर पुलाच्या दोन्ही बाजू तथा मध्यभाग वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलिकडे असलेल्या जऊरखेडा शिवारातील सुमारे ६०-७० शेतकºयांचे पीक शेतातच अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे लक्ष देत पुलाची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.सदर रस्त्याची तलाव बनविला तेव्हा मध्यम पाटबंधारे विभागाद्वारे तयार करण्यात आला होता. सोबतच नदीवर पाईपच्या पुलाची निर्मितीही कण्यात आली होती. या पुलावरून शेतकºयांना शेतमालाची ने-आण करणे सोयीचे झाले होते. तलावाकडे वाहनांनी ये-जा करता येत होती. १०-१२ वर्षांपूर्वीही हा पूल असाच वाहून गेला होता. तेव्हा पाटबंधारे विभागाकडून कंत्राटदारामार्फत दुरूस्ती करून घेण्यात आली होती. आता पुन्हा हा पूल असाच वाहून गेल्याने तलावावर वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने नदीच्या पलीकडे शेती असलेल्या शेतकºयांना सोयाबीन व अन्य शेतमाल घरी आणणे तथा विक्रीस नेणेही कठीण झाले आहे.रबी हंगामात गहू, चना पिकासाठी शेत तयार करावे लागणार आहे. नदीवरील पुलाची दुरवस्था असल्याने शेतात ट्रॅक्टर, अन्य वाहने व साहित्य नेणे अडचणीचे ठरणार आहे. यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. पाटबंधारे विभाग तथा बांधकाम विभागाने शेतकºयांची ही समस्या लक्षात घेऊन पुलाची दुरूस्ती वा नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
नदीवरील पुलाची दुरूस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:48 AM
तलावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नदीवर पूल आहे. पावसामुळे सदर पुलाच्या दोन्ही बाजू तथा मध्यभाग वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलिकडे असलेल्या जऊरखेडा शिवारातील सुमारे
ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : पुलाअभावी आवागमनाचा प्रश्न गंभीर