लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला असता आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांनी स्वत:ला अटक करून घेतली.शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी. शेतकºयांची फसवणूक करणाºया बियाणे कंपनीवर कार्यवाही करून नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देण्यात यावी. शेतीच्या पेरणी ते कापणीपर्यंत कामांचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा. घोषित झालेल्या दुष्काळग्रस्तांना दुष्काळी अनुदान द्यावे. शिवाय त्या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. ओबीसीसाठी स्वतंत्र घरकूल योजना करून आर्थिक तरतूद करावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावे. आदिवासींचे प्रलंबित वनहक्क, जमीन पट्टे त्वरित वाटप करावे. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजूर व कामगारांचा समावेश करण्यात यावा. कांदा, तूर, ऊस उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान तातडीने देण्यात यावे. नुकसानग्रस्त फळ उत्पादक शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. दुबार पेरणीधारकांना तातडीने बियाणे खते, किटकनाशके व आर्थिक मदत द्यावी. प्रकल्पग्रस्तांना पूनर्वसन मोबदला व नौकरी द्यावी. निराधार, विधवांना दहा हजार रुपये देण्यात यावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर आला असता आंदोलकर्त्यांनी टायर जाळून शासनाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध नोंदविला. यावेळी जोरदार नारेबाजीही करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. या आंदोलनाचे नेतृत्त्व आ. बच्चू कडू, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे, रसूलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी केले. आंदोलनात प्रितम कातकिडे, रेवत इंगळे, दिनेश पोपळकर, मिलिंद गव्हाणे, भुषण येलेकार, आदित्या कोकडवार, हनुमंत झोटींग, धनराज घुमे आदी सहभागी झाले होते.उपजिल्हाधिकाऱ्यांना धरले धारेवरवर्धा जिल्ह्यातील किती गाव, किती महसूल मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय त्यासाठी किती निधीची मागणी असून तसा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला काय, अशी विचारणा करीत आ. बच्चू कडू यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांना चांगलेच धारेवर धरले होते. ज्यानंतर बनकर यांनी तातडीने संबंधित अधिकारी अतुल रासपायले यांना बोलाविले. त्यांनीही वेळीच कार्यवाही न केल्याचे लक्षात येताच आ. कडू यांनी त्यांचीही कानउघाडणी केली.
टायर जाळून नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:30 PM
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला असता आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.
ठळक मुद्देप्रहारचे जेलभरो आंदोलन : मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक