लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी)त आरक्षण देत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा आशयाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी कदम यांनी स्विकारले.महाराष्ट्रातील धनगर समाज ७० वर्षांपासून राज्य शासनाकडे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची मागणी करीत आहेत. त्यासाठी सदर समाज बांधवांनी अनेकदा संबंधितांना निवेदन देत मोर्चेही काढले. इतकेच नव्हे तर रास्तारोको आंदोलनही केले. परंतु, अद्यापही मागणीवर विचार करण्यात आला नाही. भारतीय राज्य घटनेच्या अनुसूचित जमातीमध्ये अनु़ क्रमांक ३६ वर ओरान, धनगर या जमातीचा स्पष्ट उल्लेख केला आहे़ राज्य घटनेचे हिंदीत भाषांतर करताना ओरान, धनगड असे आले आहे़ महाराष्ट्रात कुठेही धनगड जमात अस्तित्वात नाही़त्या संदर्भात १३० पुरावे शासनाकडे सादर करण्यात आले, ही वास्तविक स्थिती असताना राज्यकर्ते आपल्या राजकीय स्वार्थाकरिता धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप निवेदनातून करीत धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देत तसे आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना वर्धा जिल्हा धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश भोयर, उपाध्यक्ष डॉ़ दीपक पुनसे, सचिव अरुण लांबाडे यांच्यासह मारोतराव कोल्हे, विनायक नन्नुरे, राजेंद्र पुनसे, वीरेंद्र गोरडे, बुधे, प्रशांत हुलके, दीलीप उपासे, गजेंद्र कापडे, प्रवीण पाटभाजे, संदीप पुनसे, जयप्रकाश थोटे, किशोर भोकरे, पवन खुजे, संतोष महाजन, प्रवीण टेकाडे, सतीश धवने, कवडु बुरंगे, प्रभाकर गंधे आदींची उपस्थिती होती़मराठा समाज बांधवांचे ठिय्या आंदोलनहिंगणघाट - मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या मागास असून त्यांना शिक्षणात व शासकीय नौकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून येथील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदर आंदोलन २० आॅगस्टपर्यंत सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.मराठा समाज बांधवांनी सोमवार ६ आॅगस्टपासून स्थानिक उपविभागीय महसून अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मराठा समाज बांधवांना शिक्षणात व शासकीय नौकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन सदर आंदोलनादरम्यान उपविभागीय महसूल अधिकाºयांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. आंदोलनाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्त्व यशवंत शिंदे, दिलीप जाधव, विनायक सालुंके, दिनकर घोरपडे, विजय भांडवलकर, विजय थोरवत, अशोक भोसले, प्रल्हाद जाधव, अमोल बोडखे, प्रवीण काळे, माणिक चव्हाण, उमेश लगड, राम नरवाडे, अभिजित नरवडे करीत असून आंदोलनात मराठा समाज बांधव सहभागी होते.
धनगर समाजाला आरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 9:47 PM
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी)त आरक्षण देत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा आशयाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी कदम यांनी स्विकारले.महाराष्ट्रातील धनगर समाज ७० वर्षांपासून राज्य शासनाकडे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची मागणी करीत आहेत. त्यासाठी सदर समाज बांधवांनी अनेकदा संबंधितांना निवेदन ...
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे