लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील १३ जलाशयात सध्या केवळ १३.४३ टक्केच उपयुक्त जलसाठा असून दोन प्रकल्प कोरडे झाले आहेत. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन केले असले तरी पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा, अशा कडक सूचना पाटबंधारे विभागाकडून संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.धाम नदी प्रकल्पातील पाण्याचा पुरवठा आंजी (मोठी) या गावासह वर्धा शहर आणि वर्धा शहराशेजारी असलेल्या गावांना केल्या जातो. मागील महिन्यात सुकळी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा पुरवठा वर्धेकरांसह वर्धा शहराशेजारी असलेल्या गावांमधील नागरिकांना करण्यात आला. परंतु, सध्या या प्रकल्पासह मदन प्रकल्पात उपयुक्त जलसाठा निरंक असून ते कोरडे झाले आहेत.आजमितीला धाम प्रकल्पात केवळ ४.८६ टक्केच उपयुक्त जलसाठा असून या पाण्याचे बिगर सिंचनासाठी नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध पाणी जून २०१९ अखेरपर्यंत पुरवायचे असल्याने तसेच तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपरिषद वर्धा तसेच आदी विभागांनी धाम प्रकल्पातून वेळोवेळी सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून त्याचा काटकसरीनेच वापर करावा, अशा सूचना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत.महिन्यात एकदाच सोडणार पाणीजून २०१९ पर्यंत धाम प्रकल्पातून २५ ते ३० रोजी दरम्यान एकदाच पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे संबंधितांनी वेळीच पाण्याची उचल करून त्याची विशिष्ट पद्धतीने साठवणूक करणे क्रमप्राप्त आहे. कुठल्याही परिस्थितीत महिना पूर्ण व्हावयाच्या पूर्वी पाणी सोडण्यात येणार नाही, असेही पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
जलाशयांत केवळ १३.४३ टक्के पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:18 PM
जिल्ह्यातील १३ जलाशयात सध्या केवळ १३.४३ टक्केच उपयुक्त जलसाठा असून दोन प्रकल्प कोरडे झाले आहेत. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन केले असले तरी पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा, अशा कडक सूचना पाटबंधारे विभागाकडून संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देदोन प्रकल्पात ठणठणाट : पाटबंधारेच्या संबंधितांना कडक सूचना