लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील गवंडी कामगारांच्या सेवा प्रमाणपत्रावर नोंदणीकृत नसलेल्या गवंडी ठेकेदाराकडून साक्षांकित केलेले प्रमाणपत्र ग्रा.पं. व नगर परिषद तसेच नगर पंचायत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मान्य करावे अशी मागणी गवंडी बांधकाम मजदूर युनियनच्यावतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत रामटेके यांच्या नेतृत्त्वात प्रभारी जिल्हाधिकारी अशोक लटारे यांना सादर करण्यात आले.गवंडी कामगारांना प्रत्येक वर्षी त्यांच्या नोंदणी पुस्तकाचे नुतणीकरण करण्यासाठी ठेकेदाराकडून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. इतकेच नव्हे तर त्यानंतर न.प.तील प्रशासकीय अधिकारी तर ग्रा.पं.तील सचिवांकडून त्याला प्रमाणित करून घ्यावे लागते. परंतु, सदर अधिकारी नोंदणीकृत ठेकेदाराचेच प्रमाणपत्र वैध मानत सदर प्रमाणपत्र प्रमाणित करीत आहेत.वर्धा जिल्ह्यात केवळ १० टक्केच नोंदणीकृत ठेकेदार असून मोठ्या प्रमाणात गवंडी कामगार आहेत. सदर अट सध्या गवंडी कामगारांसाठी जाचक ठरत असल्याने ती तातडीने रद्द करण्यात यावी. शिवाय गवंडी कामगारांची ठेकेदाराकडून होणारी लूट थांबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना भानुदास थुल, संतोष सेलूकर, अनिल इंगळे, गजानन खोब्रागडे, बंडू फुलझेले, चरणदास आगलावे, प्रमोद उरकुडे, विठ्ठल शेंडे, रविंद्र लांबट, दिलीप रहांगडाले, यशवंत मानेश्वर, हिरामण बांगडकर आदींची उपस्थिती होती.
गवंडी कामगारांच्या समस्या निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 6:00 AM
गवंडी कामगारांना प्रत्येक वर्षी त्यांच्या नोंदणी पुस्तकाचे नुतणीकरण करण्यासाठी ठेकेदाराकडून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. इतकेच नव्हे तर त्यानंतर न.प.तील प्रशासकीय अधिकारी तर ग्रा.पं.तील सचिवांकडून त्याला प्रमाणित करून घ्यावे लागते. परंतु, सदर अधिकारी नोंदणीकृत ठेकेदाराचेच प्रमाणपत्र वैध मानत सदर प्रमाणपत्र प्रमाणित करीत आहेत.
ठळक मुद्देगवंडी बांधकाम मजदूर युनियनचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे