सेवाग्राम : शालेय पोषण आहार योजनेतून मुख्याध्यापकांची जबाबदारी काही प्रमाणात करण्यात आली आहे. अन्न बनविण्यापासून बाकी जबाबदारी आता बचत गटांची असणार असणार आहे . या निर्णयाने मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला असून याची अंमलबजावणी नव्या सत्रांपासून होणार आहे. या निर्णयाचे पत्र शाळांना प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन, सकस आहार मिळावा या उद्देशाने या योजनेचा प्रारंभ शासनाने केला. या योजनेच्या अंमलबजावनीची जबाबदारी मुख्याध्यापकावर असल्याने कामाचा तणाव वाढला अशी तक्रार करण्यात येत होती. कालांतराने तक्रारी वाढल्या, मुख्याध्यापक संघाने याला विरोध केला. यावर शासनाने चर्चा करुन हा निर्णय घेतला. यामुळे मुख्याध्यापक तणावमुक्त झाले असले तरी पण काही प्रमाणात जबाबदारी मात्र मुख्याध्यापकांकडे असणार आहे. बचत गटांना जबाबदारी देतांना काही निकष ठेवण्यात आले आहे. यात शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घ्यावा. बचत गट हा नोंदणीकृत असला पाहिजे, याची निवड समितीला करावी लागेल. यासाठी करारनामा बचत गटाकडून करावा लागणार आहे. पत्रामध्ये आतापर्यंत काम करणार्या स्वयंपाकीन, मदतनीस यांना संरक्षण देण्यात आले आहे. तशी अट बचत गटांसमोर ठेवण्यात येणार आहे. येणार्या मालाची नोंदणी, माल सांभाळून ठेवणे, मागणी, जबाबदारी, हिशेब, मुलांच्या नोंदी, मेनू ही सर्व कामे आता गटांना करावी लागेल. या सर्व कामावर नियंत्रण मुख्याध्यापकाचे राहणार तसा अहवाल तपासने मुख्याध्यापकांना बंधनकारक राहिल. यात दोष आढळून आल्यास कारवाईची शिफारस मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीकडे करण्यात येईल असे पत्रकांत नमूद आहे. पोषण आहाराचे काम मुख्याध्यापकच सांभाळत. त्यांना काही शिक्षक मदत करीत असे, पण नव्या पत्रकाप्रमाणे सर्व शिक्षकांनी काम वाटून घ्यायची आहे. जेणे करुन शिजवण्याची यंत्रणा व्यवस्थीत कार्य करेल. आहाराची चव सर्वप्रथम स्वयंपाकी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक घेऊन नोंदवहित नोंद करतील. नंतरच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल. आहे. २०१४-१५ या शालेय सत्रापासून याची जबाबदारी बचत गटांकडे जाणार आहे. यामुळे मुख्याध्यापकांना टेंशन फ्री वाटणार यात शंका नाही.(वार्ताहर)
शालेय पोषण आहाराची जबाबदारी बचत गटाकडे
By admin | Published: May 10, 2014 12:26 AM