वर्धा : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नाही़ हा भत्ता कधी प्राप्त होणार, असा सवाल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला आहे़ याबाबत केंद्र तथा राज्य कर्मचारी सेवानिवृत्त वेलफेअर संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी कोषागार अधिकारी बानकर यांना निवेदन सादर केले़ यावेळी सेवानिवृत्तांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली़सेवानिवृत्तांना १०० टक्के महागाई भत्ता शासन आदेशान्वये माहे जुलै २०१४ पासून लागू करण्यात आला आहे़ जानेवारी ते एप्रिल २०१४ च्या १० टक्के वाढीचा शासकीय आदेश २२ सप्टेंबर २०१४ रोजी प्राप्त झाला; पण सिस्टीममध्ये तो न आल्याने महागाई भत्त्याची थकबाकी आॅक्टोबर २०१४ च्या नोव्हेंबरमध्ये प्राप्त होणाऱ्या पेन्शनसोबत देण्यात येईल, असे सांगण्यात आले़ ८० वर्षांच्या वरील पेन्शनरांना शासन आदेशान्वये १० टक्के वाढ जुलै २०१४ च्या पेन्शनसोबत देण्यात आली; पण एप्रिल २०१४ पासूनची थकबाकी शिल्लक आहे़ याबाबत सप्टेंबर २०१४ च्या पेन्शनसोबत प्राप्त होईल, असे बानकर यांनी सांगितले़ १५ वर्षांवरील कम्युटेशनची रक्कम, संयुक्त खाते उघडणे याबाबत कोषागार अधिकारी सहकार्य करीत असल्याचे गौरशेट्टीवार यांनी सांगितले़ या प्रसंगी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अन्य समस्यांवरही चर्चा करण्यात आली़ यावेळी मुळे, मोहता, देशमुख, वाळके, शिंगोटे उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
सेवानिवृत्त कर्मचारी महागाई भत्त्यापासून वंचित
By admin | Published: September 29, 2014 11:10 PM