लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले. खरीपाच्या प्रारंभी पावसाच्या प्रतीक्षेत शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले होते. तर आता परतीच्या पावसाने शेतात कसेबसे आलेल्या उत्पादनाची धुळदान केल्याने शेतकºयाच्या डोळ्यात पाणी आले आहे. यंदाच्या हंगामात पावसाने शेतकºयांना फटका दिल्याचे दिसत आहे.हवामान खात्याचा कधी नव्हे तो पावसाचा अंदाज खरा ठरला. जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. शनिवारी जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ज्यांनी सोयाबीनची कापणी करून गंजी लावून ठेवली होती. त्यांचे सोयाबीन ओले झाले तर ज्यांनी कापणीची तयारी सुरू केली त्यांच्या तयारीला ब्रेक बसला आहे. तर मान्सून पूर्व पेरणी केलेल्या कापूस उत्पादकांच्या शेतात कपाशीची बोंडे फुटली असून तो कापूस या पावसामुळे ओला झाला आहे. असे असले तरी या पावसाचा तुरीला लाभ होईल असे शेतकरी बोलत आहे. या पावसामुळे तुरीची वाढ होवून येत्या दिवसात पडणाºया थंडीमुळे तुरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविण्यात आली आहे. पावसाचा फटका सेलू, आष्टी, पवनार, वर्धा, वायगाव आदि भागांसह इतर गावातील शेतकºयांना बसला आहे.पावसाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकºयांकडून पेरण्या उशिरा झाल्या. तर काहींकडून दुबार पेरणी करण्यात आली होती. यामुळे त्यांच्या कपाशीला बोंडे पकडली असून ती या पावसाच्या माºयामुळे गळत आहेत. तर ओली झालेली बोंडे ढगाळ वातावरणामुळे सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन गेल्याची चिन्हे आहेत तर कपाशीलाही फटका बसला आहे.अनेकांच्या शेतातील बोंडे गळाली, कापूसही पडलाविजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसाचा फटका सोयाबीनसह कापूस उत्पादकांनाही बसत असल्याचे दिसून आले आहे. मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केलेल्या कपाशीचा कापूस निघणे सुरू झाला आहे. तर उशिरा पेरणी झालेल्या कपाशीला बोंडे आली आहेत. यातच आलेल्या पावसासह काही भागात वारा असल्याने ही बोंडे गळत आहेत. तर ज्या शेतात कापूस फुटला आहे त्यांचा कापूस ओला झाला आहे. यामुळे परतीचा पाऊस शेतकºयांकरिता लाभाचा कमी तर तोट्याचा अधिक असे चित्र निर्माण झाले आहे. या पावसाचा लाभ खरीपापेक्षा रबीला होण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून आले आहे.आणखी चार दिवस राहणार पाऊससध्या निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस येत आहे. यामुळे आणखी चार दिवस पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याच्या सुत्रांनी वर्तविली आहे. हा परतीचा मान्सून सध्या हाती येत असलेल्या पिकांकरिता धोक्याचा ठरत असल्याचे दिसून आले आहे. शेतात असलेली सोयाबीनची गंजी प्लास्टिकच्या कापडाने गुंडाळून ठेवण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
परतीच्या पावसाचा खरिपाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:18 AM
जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले. खरीपाच्या प्रारंभी पावसाच्या प्रतीक्षेत शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
ठळक मुद्देजिल्हाभर पाऊस : अनेकांच्या सोयाबीनची गंजी झाली ओली; शेतकरी चिंतेत