वर्षभरापासून चौकशी समितीच्या अहवालाची पोलिसांना प्रतीक्षामहेश सायखेडे। लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजीकच्या ११ ग्रा.पं.तील बांधकाम परवानगीची चौकशी स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने सुरू आहे. या तपासणी आढळलेल्या काही प्रकरणाची चौकशी करण्याकरिता पोलिसांनी तहसीलदारांना पत्र दिले. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेवरून उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती नेमण्यात आली. परंतु, या समितीने वर्ष लोटूनही अहवाल सादर केला नसल्याने या प्रकरणात महसूल विभागाच्या चुप्पीबाबत चर्चा सुरू झाली आहे. वर्धा शहरानजीकच्या ११ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बांधकाम परवानगी देताना गैरप्रकार झाल्याचे पुढे आल्यानंतर सावंगी पोलिसात गुन्हा दाखल झाला. सदर प्रकरणाचा व्याप लक्षात घेता या तपास एलसीबीकडे देण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना ज्या भुखंडावर ले-आऊट टाकण्यात आले ते अकृषक नसल्याचे समोर आले. तर एनए बनावटी असल्याचे निदर्शनास आले. परंतु, त्याची शहानिशा करण्यासाठी तपासी अधिकाऱ्यांनी तीन प्रकरणे वर्धा तहसीलदारांना पाठविले. त्याची शहानिशा करून तहसील कार्यालयाने तीन पैकी १ प्रकरण योग्य तर दोन प्रकरणातील एनए बनावटी असल्याचा अहवाल पोलिसांना सादर केला आहे. हा प्रकार नागरिकांची फसवणूक करणारा असल्याने पोलिसांनीकडून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी २३ फेब्रुवारी २०१६ रोजी एका पत्रान्वये तक्रार तसेच आणखी किती बनावटी एनए तयार करण्यात आले याची माहिती देण्याकरिता महसूल विभागाला पत्र दिले. मात्र, पंधरा महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप त्या पत्राचे उत्तर आले नसल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. सध्या पोलिसांना प्रभावी कारवाईसाठी महसूल विभागाच्या सदर अहवालाची प्रतीक्षा आहे.चौकशी समितीचे कामकाज ढिम्मजिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनांवरून विशेष चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार, एक नायब तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील एका लिपिकाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. सदर समिती तयार करून बऱ्याच महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही समितीने आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेला नाही. या समितीचे कामकाज कासवगतीनेच सुरू आहे.तब्बल ६०० एकर जागेवर प्लॉटचा संशय शहरानजीकच्या ११ ग्रा.पं. कार्यक्षेत्रात बांधकाम परवानगी देताना झाल्याच्या गैरप्रकराचा तपास करताना तब्बल ६०० एकरात हा गोरखधंदा झाल्याने समोर आले आहे. यात अनेकांच्या चौकशीची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण केले आहे. १०० टक्के काम लवकरच पूर्ण करून समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल.- घनश्याम भुगावकर, उपविभागीय महसूल अधिकारी वर्धा.
११ ग्रामपंचायतीच्या प्रकरणात महसूलची चुप्पी
By admin | Published: May 30, 2017 1:07 AM