लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कामामुळे रेती माफियांची हिंमत पुन्हा वाढत असल्याचे दिसून आले आहे. पुलगाव येथे महसूल विभागाने जप्त केलेली रेती भर दिवसा या माफियांकडून उचलण्याचा प्रयत्न झाला. सदर प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी कारवाई करीत तब्बल नऊ टिप्पर जप्त केले. या कारवाईत एकूण ५४ हजार रुपयांची १८ ब्रास रेती आणि वाहन असा एकूण ४० लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली आहे.पुलगाव शहरातील एकलासपूर, पंचधारा रोड, पुलगाव येथील ईदगाहला लागून असलेल्या मोकळ्या जागेमध्ये असलेला रेतीसाठा यापुर्वीच महसूल प्रशासनाकडून जप्त करण्यात आला होता. जप्त असलेला सदर वाळुसाठ्यातून अवैधरित्या उचल होत असल्याची माहिती मिळताच ठाणेदार मुरलीधर बुराडे व नायब तहसीलदार उल्हाससिंग राठोड, पटवारी ओमप्रकाश सातपुते यांनी संयुक्तरित्या पंचधारा रोड येथे धाड टाकत कारवाई केली.येथे एमएच २३ एम ६२८ चालक प्रकाश देवकर (५२), रा. वडारपुरा, अमरावती, एमएच १४ बीजे १०६२ चालक विठ्ठल शेळके (३५), रा. वडारपुरा अमरावती, एमएच १२ ईएफ ३३६८ चालक जीवन चव्हाण (३२) वडारपुरा, अमरावती, एमएच ०४ ई २०९३ चालक सैयद रउफ सैयद मुश्ताक (२७) रा. शेवती जहागीर, अमरावती, एमएच ३२ क्यू ८५५५ चालक अजय जगताप (४०) रा. वडारपुरा, अमरावती, एमएच २७ सी ७०६ चालक देवानंद खडसे (४०) रा. पहुर, जिह. यवतमाळ, एमएच ४० ७२३४ चालक ताराचंद बडवे (५२) रा. फैजलपुरा, अमरावती, एमएच २७ एक्स ५१९६ चालक पसार, एमएच २९ टी १४९३ चालक पसार असे एकूण नऊ टिप्पर रेती नेताना दिसून आले.प्रत्येक टिप्पर मध्ये दोन ब्रास रेती अशी एकूण १८ ब्रास रेती जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा जप्ती पंचनामा कारवाई करून पुलगाव येथील नायब तहसीलदार उल्हाससिंग राठोड यांच्या लेखी तक्रारीवरून नमुद आरोपीतांविरूद्ध पुलगाव ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेती आरोपीतांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस काठडी सुनावण्यात आली आहे.ही कारवाई एसपी निर्मलादेवी एस., एसडीपीओ डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे, सहायक पोलीस निरीक्षक अहफाज सैयद, पोलीस उपनिरीक्षक आकाश शाही, चेतन मराठे, जमादार विवेक बनसोड, सुधाकर बावणे, निकेश गुजर, असिम शेख, चालक जयंत ठाकरे, सुभाष गायकवाड आणि सैनिक कैलास चव्हाण, भूषण मोकळकर यांनी केली आहे.
महसूलच्या जप्तीतील रेतीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:20 AM
जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कामामुळे रेती माफियांची हिंमत पुन्हा वाढत असल्याचे दिसून आले आहे. पुलगाव येथे महसूल विभागाने जप्त केलेली रेती भर दिवसा या माफियांकडून उचलण्याचा प्रयत्न झाला.
ठळक मुद्देनऊ टिप्पर ताब्यात : रेतीसह एकूण ४०.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त