प्रधान सचिवांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चावर्धा : राज्य शासनाने सेवाग्रामच्या विकासासाठी २७० कोटी रूपयांच्या आराखड्यासाठी मंजुरी दिली आहे. या विकास कामाबाबत मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा केली. तसेच सेवाग्राम येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.सेवाग्राम विकास आराखड्याबाबत तातडीची कामे हाती घेण्यासाठी ५० कोटी उपलब्ध झाले आहेत. कामाला तात्काळ सुरूवात करावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. यामध्ये १ हजार व्यक्तीसाठी सभागृह, परिसराची सुविधा, अभ्यास केंद्र व ग्रंथालय, कस्तुरबा चौकाचे सुशोभिकरण, पर्यटकांसाठी सुविधा, यात्री निवास दुरूस्ती आणि वर्धा येथील मगन संग्रहालय, एमगिरी गांधी हाट येथील सुशोभिकरण, मुख्य जंक्शनची सुधारणा यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शासन निर्णय निर्गमित झाल्यावर तातडीने उर्वरित कामांना प्रारंभ करण्यात येईल, असे सांगितले. जिल्हाधिकारी यांनी प्रधान सचिव यांना जिल्हा माहिती कार्यालयाने प्रकाशित केलेली वर्धा पर्यटन पुस्तिका भेट दिली.(शहर प्रतिनिधी)
सेवाग्राम विकास आराखड्याचा आढावा
By admin | Published: September 01, 2016 2:17 AM