लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : धकाधकीचे जीवन व्यतित करीत असताना समाजातील घटकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्य ठीक नसेल तर आपल्याकडे असलेल्या पैशाचा व बाळगलेल्या श्रीमंतीचा काही एक फायदा नसल्याने याकडे लक्ष देणे हीच खरी गुरुकिल्ली ठरली आहे, असे विचार खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.जि.प. च्या वतीने आयोजित तालुकास्तरीय आरोग्य शिबिरात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती विद्या भुजाडे होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, जि.प. सदस्य वैशाली येरावार, पं.स. गटविकास अधिकारी मनोहर बारापात्रे व पं.स. सदस्य युवराज खडतकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.पैश्याअभावी अनेक मोठ्या आजरांना तोंड देणे शक्य होत नसल्याने पंतप्रधान आयुष्यमान योजनेतून दिलासा देण्याचे काम होत असल्याचे खा. तडस यांनी सांगितले. या माध्यमातून उपचारासाठी पाच लाखांपर्यंतची मदत देण्याचे धोरण असल्याने ही योजना समाजातील आर्थिक कमकुवत घटकांसाठी तारणहार ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डवले म्हणाले, असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढून २५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. स्त्रियांमधील गर्भाशयाचा व स्तनाच्या कॅन्सर सोबतच युवकांमध्ये मुखकर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर स्थिती असल्याने अशा आजारांच्या निदानासाठी तालुकास्तरीय शिबिर घेतले जात असल्याचे सांगितले.यावेळी खासदार तडस यांच्या हस्ते रुग्णालयातील ओपीडीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांचे आयोजित शिबिरात निदान व उपचार करण्यात आले.प्रास्ताविक डॉ. प्रवीण धमाने तर संचालन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले. आभार आरोग्य विस्तार अधिकारी सालम शेख यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय दाढे, डॉ. प्रज्ञा तिवसकर, डॉ. कोमल कठाणे, डॉ. अनघा सोनवणे, डॉ. पल्लवी चव्हाण, डॉ. तिवारी, डॉ. मनीष झाटे, डॉ. अमोल गिरी, विस्तार अधिकारी प्रमोद लकडे, शरद डांगरे, प्रमोद घुळे, सूर्यकांत वाघोले, अजाज शेख, प्रशांत आदमने, शेख हुसेन, बबिता ताकसांडे, सिद्धार्थ तेलतुमडे, सहायक हिवताप अधिकारी काळसर्पे, दीपक कामडी, सरिता गोटेकर, पद्मा खडसान, संजय परतेकी, संजय तायडे तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी व रुग्णांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शिबिरात तीन हजार रुग्णांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.
आरोग्यासमोर माणसाने बाळगलेली श्रीमंती व्यर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 6:00 AM
जि.प. च्या वतीने आयोजित तालुकास्तरीय आरोग्य शिबिरात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती विद्या भुजाडे होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, जि.प. सदस्य वैशाली येरावार, पं.स. गटविकास अधिकारी मनोहर बारापात्रे व पं.स. सदस्य युवराज खडतकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ठळक मुद्देरामदास तडस : तालुकास्तरीय रोगनिदान शिबिरात तीन हजार रुग्णांची आरोग्य तपासणी, उपचार