लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : मागील काही तासांपासून हिंगणघाट शहरासह जिल्ह्यातील नागरिकाच्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या स्थानिक तुकडोजी वॉर्ड येथील रिता ढगे हत्या प्र्रकरणाचा छडा लावण्यात हिंगणघाट पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी चंद्रपूर येथून ताब्यात घेत अटक केली असून चोरीसाठी रिना अडसर ठरल्याने तिला चाकूने मारहाण करून ठार करण्यात आल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. वाल्मिक चंदनखेडे व मयुर सातघरे दोन्ही रा. हिंगणघाट, अशी आरोपींची नावे आहेत.स्थानिक तुकडोजी वॉर्डातील प्रमोद ढगे यांच्या मुलीचे लग्न मे महिन्यात ठरले आहे. त्यामुळे लग्नाची पूर्वतयारी म्हणून घराची रंगरंगोटी जवळच राहणाऱ्या मयुर सातघरे ठेका पद्धतीने १५ दिवसांपूर्वी देण्यात आली होती. त्यानंतर मुख्य आरोपी असलेला वाल्मिक चंदनखेडे मयुर सोबत ढगे यांच्या घरी आला होता. शुक्रवारी दुपारीच मयूर हा वाल्मिकला सोबत घेऊन कामाचे पैसे घेण्यासाठी ढगे यांच्या घरी घेऊन गेला. याच वेळी रिता या घरी एकट्या असल्याची संधी साधून दोघांनी चोरीचा कट रचला. याच वेळी आरोपींकडून रिता यांना पिण्यासाठी पाण्याची मागणी करण्यात आली. त्या पाणी घेण्यासाठी स्वयंपाक खोलीत जात असताना वाल्मिकने सोबत असलेल्या चाकूने रिता यांना मारहाण केली. जखमी अवस्थेतील रिता यांनी आरडाओरड केल्यावर मयुरने झटपट ढगे यांच्या घरातून पळ काढला. याच वेळी वल्मिकला रिताला मारहाण करताना काहींना खिडकीतून दिसला. शिवाय चाकूचा धाक दाखवत आरोपी वाल्मिकने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत जखमी झालेल्या आरोपीने घरी हाताला पट्टी बांधून दुचाकीने खांबाडा जवळील कोसरसार गाठले. तेथे त्याने आतेभावाकडून ३०० रुपये घेत प्राथमिक आरोग्य केंद्रात बनावटी नाव सांगून उपचार घेतला. त्यानंतर आरोपीने चंद्रपूर गाठले होते. मात्र, आरोपीच्या मागावर असलेल्या हिंगणघाट पोलिसांनी आरोपीला चंद्रपूरातून अवघ्या सात तासात ताब्यात घेत हिंगणघाट येथे आणले. तर त्याच्या पाठोपाठ पोलिसांनी दुसरा आरोपी असलेल्या मयुर सातघरे यालाही ताब्यात घेतले आहे.दोन घरांची केली होती पाहणीघटनेच्या काही वेळापूर्वी आरोपींनी चोरीच्या उद्देशाने दोन घरांची पाहणी केली होती. मात्र, तेथे त्यांना आपले काम फत्ते करता आले नव्हते. त्यातच लग्नाचे घर असल्याने येथे मोठी रक्कम आणि दागिने मिळतील, या आशेने त्यांनी ढगे यांच्या घरात चोरी करण्याचा कट रचत घरात प्रवेश मिळविला होता. परंतु, रिताच्या ओरडण्यामुळे परिसरातील नागरिक गोळा झाले अन् तो बेत फसला. आरोपी वाल्मिक चंदनखेडे याला न्यायालयाताने २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.आठ दिवसांपूर्वी खरेदी केला होता चाकूपोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी सध्या पोपटासारखेच बोलत आहेत. सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू हा आरोपींनी घटनेच्या आठ दिवसांपूर्वी खरेदी केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.
चोरीसाठी अडसर ठरल्याने काढला रिताचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:57 PM
मागील काही तासांपासून हिंगणघाट शहरासह जिल्ह्यातील नागरिकाच्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या स्थानिक तुकडोजी वॉर्ड येथील रिता ढगे हत्या प्र्रकरणाचा छडा लावण्यात हिंगणघाट पोलिसांना यश आले आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । रिता ढगे हत्याप्रकरण, हिंगणघाट पोलिसांनी दोघांना सात तासात ठोकल्या बेड्या