लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारोहात रितिका त्रिपाठी हिने सर्वाधिक आठ सुवर्ण पदके व तीन रोख पुरस्कार प्राप्त केले. यासह विविध आयुर्विज्ञान शाखेतील एकूण ११८ विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या २३ व्यक्तींना आचार्य पदवी प्रदान केली तर १५ विद्यार्थ्यांना फेलोशीप आणि ५ विद्यार्थ्यांना मेडिकॉन युवा वैज्ञानिक पुरस्कारही प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुलपती दत्ता मेघे, राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, प्र-कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, अशोक चांडक, डॉ. बी.जे. सुभेदार, मुख्य समन्वयक डॉ. एस.एस. पटेल, डॉ. सतीश देवपुजारी, कुलसचिव डॉ. ए. जे. अंजनकर, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉ. अभय मुडे, दंतविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक पखान, डॉ. मीनल चौधरी, आयुर्वेद शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, रवी मेघे, भौतिकोपचार शाखेचे डॉ. अथरूद्दीन काझी, डॉ. सोहन सेलकर, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. व्ही. के. देशपांडे, डॉ. सुब्रत सामल, डॉ. प्रीती देसाई, डॉ. प्रज्ञा निखाडे, डॉ. आदर्शलता सिंग, डॉ. सुनीता श्रीवास्तव, परिचर्या शाखेच्या सीमा सिंग, वैशाली ताकसांडे, राजीव यशराय, डी.एस. कुंभारे आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमात डॉ. तन्मय गांधी यांनी सात सुवर्ण पदके, डॉ. हरमनदीपसिंग यांना चार सुवर्ण, वसुधा उमाटे हिला तीन सुवर्ण व एक रौप्य पदक आणि तीन रोख पुरस्कार, भेषना साहू व सत्यजित साहू यांना प्रत्येकी तीन सुवर्ण पदके व एक रोख पुरस्कार, आश्लेषा शुक्ला हिला तीन सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. या समारोहात वैद्यकीय शाखेतील २९८ व दंतविज्ञान शाखेतील १६० (पीएचडी, एमडी, एमएस, स्रातकोतर, स्नातक), आयुर्वेद शाखेतील ८५ परिचर्या शाखेतील १३७ तर परावैद्यकीय शाखेतील १९ विद्यार्थ्यांसह एकूण ७०० विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून आरोग्य सेवेची दीक्षा घेतली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. नाझनी काझी आणि डॉ. श्वेता पिसूळकर यांनी केले. समारोहाची सुरूवात विद्यापीठगीताने झाली. डॉ. प्रियंका निरंजने यांनी पसायदान सादर केले. राष्ट्रगीताने दीक्षांत समारोहाची सांगता झाली. या कार्यक्रमाला आ. डॉ. पंकज भोयर, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी आदी उपस्थित होते.
रितिका त्रिपाठीला सर्वाधिक सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:36 PM
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारोहात रितिका त्रिपाठी हिने सर्वाधिक आठ सुवर्ण पदके व तीन रोख पुरस्कार प्राप्त केले. यासह विविध आयुर्विज्ञान शाखेतील एकूण ११८ विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आले.
ठळक मुद्दे२३ व्यक्तींना आचार्य पदवी प्रदान : आयुर्विज्ञान शाखेतील ११८ विद्यार्थी गौरवान्वित