लोकमत न्यूज नेटवर्कमांडगाव : समुद्रपूर तालुक्यातील बोर व धाम नदी पाण्याविना ओस पडल्या आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात पाण्याने पावसाने पाठ फिरवली व कित्येक दिवसांपासून कालव्याचे पाणी सोडले नसल्याने नद्या, नाले ओस पडले आहे व दुष्काळाचे चटके बसू लागले आहे.सुजातपूर, सावंगी, देरडा, नांदरा आष्टा, बावापूर, जेजूरी, धानोली, साकुर्ली, मदनी, दिंदोडा, तरोडा, करंजी काजी, मांडगाव व कित्येक गावे या नद्यांना येणाऱ्या कालव्याच्या पाण्यावर ओलीतासाठी व पिण्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कालव्याला पाणी न सोडल्याने उभी पीके करपण्याच्या मार्गावर आहेत व सुजातपूर गावात जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी जेसीबीने नदीत खड्डे करून पाण्याची व्यवस्था केली जात आहे. खासदार, आमदारांनी निवेदन देवून शेतकऱ्यांनी साकडे घातले आहे. व प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे. नोव्हेंबर महिन्यातच ही व्यथा आहे तर उन्हाळा अजून बाकी आहे. आतापासून जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर आम्ही मरणानंतर पाणी मिळेल काय असा प्रश्न गावकरी प्रशासनासमोर उपस्थित करीत आहे.कालव्याला पाणी सोडले नाही तर चणा, गहू खरीप पीके करपणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.
नदी पडली कोरडी, दुष्काळाची चाहुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 12:09 AM