लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : पढेगाव सेलसुरा डांबरी रस्त्याच्या कडा खचल्याने वाहतुकीस व वहिवाट करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांनी केली आहे.मागील उन्हाळ्यात जलयुक्त शिवारअंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशनच्या वतीने येथील भदाडी नदीचे रूंदीकरण व खोलीकरण करण्यात आले. कामातील अनियमिततेमुळे पढेगाव-सेलसुरा डांबरी रस्त्याच्या कडा खचल्या. परिणामी, वाहतूक प्रभावित झाली आहे. नदीपात्राचे काम करतेवेळी रस्त्याचा विचार न करताच नदीपात्र रूंद करण्यात आले. पाणी साचण्याकरिता खड्डा करण्यात आला. १०-१५ दिवस झालेल्या संततधार पावसाने नदीला पूर आलात व या पुराने रस्त्याच्या कडेला टाकलेला मातीचा भराव पूर्णत: वाहून गेला. यामध्ये डांबरी रस्त्याच्या कडा खचल्या. यामुळे वहिवाट धोक्यात आली असून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. पढेगाव ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असून पढेगाव शिवारात या रस्त्यावरील जुना पूल जीर्णावस्थेत आहे. पुलावर मोठे भगदाड तयार झाले आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.शेतकऱ्यांचा वहिवाटीचा प्रश्न गंभीररस्त्याचे ५-६ वर्षांपूर्वी पुर्वी नव्यानेच डांबरीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून तर आजपर्यंत या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. या रस्त्यालगत १०० शेतकऱ्यांची ५०० एकरच्या वर शेती आहे. या मुळे वहीवाटीचा प्रश्न गंभीर आहे. रस्त्याची दुरूस्ती त्वरित करण्यात यावी, अशी मागणी गावकरी व ग्रामपंचायतीने केली आहे.
नदीपात्राचे रूंदीकरण; रस्त्याच्या कडा खचल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:06 AM
पढेगाव सेलसुरा डांबरी रस्त्याच्या कडा खचल्याने वाहतुकीस व वहिवाट करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांनी केली आहे.
ठळक मुद्देपूल झाला जीर्ण : पढेगाव- सेलसुरा रस्त्याची दैनावस्था