लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा मोटर मालक संघटनेच्या नेतृत्त्वात शुक्रवारी शहराशेजारच्या पिपरी (मेघे) भागातील जुनापाणी चौरस्ता, वर्धा-नागपूर मार्गावरील दत्तपूर चौरस्ता व वर्धा-यवतमाळ मार्गावरील सावंगी टि-पॉर्इंट भागात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या विविध मागण्या रेटून धरल्या होत्या. सुमारे तासभर चाललेल्या रस्तारोको आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती.शुक्रवारपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात राज्यातील १३ लाखहून अधिक व्यावसायिक वाहन मालक व चालक सहभागी झाले आहेत. वर्धा जिल्हा मोटर मालक संघटनेच्या नेतृत्त्वात शुक्रवारी शहरानजीकच्या तीन ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी इंशुरन्स प्रिमीयम मध्ये करण्यात आलेली वाढ मागे घेण्यात यावी, गैरपादर्शीय असलेले टोल नाके बंद करण्यात यावे, वाहनमालकांवर बऱ्यापैकी आयकर लादण्यात आला असून तो मागे घेण्यात यावा. डिझेलच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने योग्य पाऊल उचलावित आदी मागण्या यावेळी रेटून लावल्या होत्या. आंदोलनामुळे त्या तिन्ही ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली होती. आंदोलनात सुधाकर सुरकार, विपीन पांडे, प्रमोद उमाटे, विशाल साटोणे, मनिष कांबळी आदी सहभागी झाले होते.
मोटार चालक-मालकांचा रस्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:27 PM
जिल्हा मोटर मालक संघटनेच्या नेतृत्त्वात शुक्रवारी शहराशेजारच्या पिपरी (मेघे) भागातील जुनापाणी चौरस्ता, वर्धा-नागपूर मार्गावरील दत्तपूर चौरस्ता व वर्धा-यवतमाळ मार्गावरील सावंगी टि-पॉर्इंट भागात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या विविध मागण्या रेटून धरल्या होत्या.
ठळक मुद्देखोळंबली होती वाहतूक : विविध मागण्यांचे सादर केले निवेदन