शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
2
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
3
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
4
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
5
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
6
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
7
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
8
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
9
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
11
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
13
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
14
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
15
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
16
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
17
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
18
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
19
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
20
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल

शासकीय वसाहतीतील रस्त्यांची दैना

By admin | Published: May 06, 2017 12:36 AM

जिल्हास्थळी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील रस्त्यांची चाळणी झाली आहे.

डागडुजीचा विसर : रस्त्यांचे डांबरीकरणही उखडले वर्धा : जिल्हास्थळी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील रस्त्यांची चाळणी झाली आहे. या रस्त्याच्या डागडुजीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. आजवर या रस्त्यांची साधी डागडूजी करण्यात आली नाही. या रस्त्यावर खोल खड्डे पडले असून यावरुन वाहन घेऊन जाणे तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. वसाहतीतील काही रस्त्यांची खड्डं्यामुळे चाळणी झाली आहे. या रस्त्यांचा वापर वसाहतीतील कर्मचाऱ्यांसह अन्य नागरिक करतात. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा विस्तार एनसीसी मैदानापासून क्रीडा संकुल ते गो.से. महाविद्यालय आणि हेड पोस्ट आॅफिसपर्यंत आहे. या वसाहतीत महसूल विभाग, न्यायालय, पंचायत समिती तसेच विविध शासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवास आहे. येथे मुलभूत सुविधांचाही अभाव असून याक्डे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी) दुरुस्तीच्या प्रस्तावावर केवळ चर्चा या वसाहतीतील रस्ते जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महत्त्वाच्या मार्गांना जोडतात. शिवाय हे रस्ते कमी अंतराचे असल्याने येथून वर्दळ सुरू असते. मात्र रस्त्यांची झालेली दैनावस्था पाहता येथून आवागमन करताना अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्यावर खोल खड्डे पडले असून पावसाळ्यात तर येथे डबके तयार होते. रस्त्यावरील डांबरीकरणाचा स्तर निघाला असून मुरूम बाहेर पडला आहे. या निसरड्या रस्त्यावरुन दुचाकी वाहन घसरून अपघात झाले. काही भागातील खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी झाली आहे. येथे रस्ता आहे काय, असा प्रश्न वाहनचालकांना पडल्याशिवाय राहत नाही. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याचे डागडुजी करण्यावर आजवर अनेकदा चर्चा झाल्याची माहिती आहे. अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे.