लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यातच रस्त्यांच्या दुरूस्तीची गरज असते. तशी तजवीजही शासनाकडून केली जाते; पण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने पहिल्याच पावसात जिल्ह्यातील रस्त्यांची पोलखोल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदाही पहिला पाऊस पडताच अनेक रस्त्यांची वाताहत झाली आहे. ग्रामीण रस्ते व त्यावरील पुलांची त्याहुनही विपरित स्थिती आहे. यामुळे पावसाळ्यात दळणवळण ठप्प होण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.बांधकाम विभागाकडून रस्त्यांची कामे उन्हाळ्यात पूर्ण करणे गरजेचे असते. पावसाळ्यामध्ये केलेली रस्ता दुरूस्ती दीर्घकाळ टिकाव धरू शकत नाही. यामुळे शासनाकडूनही तत्सम दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो; पण यंदा नवीन रस्त्यांची कामे सुरू असल्याने कुठल्याही जुन्या रस्त्यांची डागडुजी, दुरूस्ती वा नुतनीकरण करण्यात आले नसल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, पहिला पाऊस पडताच अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पुलगाव ते वर्धा हा दु्रतगती मार्गही पहिल्याच पावसात खड्डेमय झाला आहे. शिवाय बजाज चौकातील खड्डेही उघडे पडलेत.पांदण रस्त्याची लावली पावसाने वाटचिकणी (जा.) - पढेगाव येथून निमगावला जाणाऱ्या पांदण रस्त्याची पहिल्याच पावसाने खस्ताहालत झाली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न गंभीर झााला आहे. या मार्गावर पढेगाव येथील ३०-४० शेतकºयांची १०० एकरच्या वर शेती आहे.खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी व्यस्त आहेत. कपाशीची लावण करण्यासाठी शेतात शेतीसाहित्याची ने-आण करावी लागत आहे. शेतकरी व शेतमजूरही याच मार्गाने ये-जा करतात. या रस्त्याचे चार वर्षांपूर्वी मातीकाम करण्यात आले; पण समोर काहीही झाले नाही. यामुळे संपूर्ण रस्त्यावर माती व चिखल दिसून येतो. ही माती काळी असल्याने पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते. यंदाही पहिल्याच पावसात संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. चार वर्षांपासून सदर पांदण रस्त्याचे खडीकरणही करण्यात आले नाही.सदर रस्त्याचे अंतर अंदाजे ३ किमी असून खडीकरण करण्याकरिता येथील ग्रामपंचायत व शेतकºयांनी संबंधित विभागाला निवेदने दिली होती; पण याची कुणीही दखल घेतली नाही. परिणामी, काही माती असल्याने पावसाळ्यात वहीवाट करताना तारेवरची कसरत करावी लागते. शेतीची मशागत करणे व शेतमजूर शेतापर्यंत नेणेही कठीण होऊन बसले आहे. जमीन सुपिक असल्याने शेतकरी ती पडिक ठेवत नाही; पण खडीकरण न झाल्यास या मार्गावरील शेती पडिकच राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देत सदर रस्त्याचे खडीकरण करावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिलीप पुनसे हरिभाऊ पेटकर, रामभाऊ शेंडे, रतन पेटकर, गजानन शेंडे, नामदेव काचोळे, गोपाल दुधाने, मोरेश्वर आंबटकर, भाऊराव कुरसाने, वासुदेव हिवरकर, महादेव रघाटाटे, संजय पहाडे यासह शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.पुलाच्या कडा खचल्याचिकणी - चिकणी ते पढेगाव या रस्त्यावर येथून एक किमी अंतरावर नाल्यावर पूल आहे. या नाल्याचे रूंदी, खोली व सरळीकरण करण्यात आले. सदर नाल्याला ४-५ किमीवरून पाणी येत असल्याने त्याची ओढ अधिक असते. पहिल्याच पावसात सदर नाल्याला पूर आल्याने पुलाच्या खालील पाईपमध्ये कचरा साचून पाणी पुलावरून वाहते झाले. यामुळे पुलाच्या कडा खचल्या. संबंधित विभागाने लक्ष देत पाईप मोकळे करणे गरजेचे आहे.
अल्प पावसातच रस्त्यांची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:52 PM
पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यातच रस्त्यांच्या दुरूस्तीची गरज असते. तशी तजवीजही शासनाकडून केली जाते; पण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने पहिल्याच पावसात जिल्ह्यातील रस्त्यांची पोलखोल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदाही पहिला पाऊस पडताच अनेक रस्त्यांची वाताहत झाली आहे. ग्रामीण रस्ते व त्यावरील पुलांची त्याहुनही विपरित स्थिती आहे. यामुळे पावसाळ्यात दळणवळण ठप्प होण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देद्रुतगतीसह राज्यमार्गांवरही खड्डे : पुलांचीही अनेक ठिकाणी क्षती