वर्धा-नागपूर मार्ग जीवघेणा : पक्की दुरुस्ती होत नसल्याने वाहतुकीस अडथळाघोराड : वर्धा - नागपूर रस्त्याला जागोजागी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांची डागडूजी सुरू आहे. पण खड्डे बुजविताना वापरल्या जात असलेले डांबर हे नावापुरतेच असल्याने किती दिवसांपर्यंत ही डागडूजी टिकणार असा प्रश्न या मार्गाने नियमित ये-जा करीत असलेल्या प्रवाशांना निर्माण होत आहे.सेलू येथील विकास चौकातून नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. डांबरीकरणाच्या मुलाम्याने सदर खड्डे बुजविल्या जात असले तरी खड्ड्यांत टाकली जाणारी खडी पक्की होण्यासाठी तळावर नाममात्र डांबराच्या रेषा फाडल्या जात आहे. यावर ६ ते १२ इंच कोरडी खडी भरण्याचा प्रकार सुरू आहे. तर वरून खड्ड्यांची डागडूजी चांगली दिसावी यासाठी नाममात्र डांबरी चुरी टाकल्या जात आहे. डागडूजीसाठी आलेल्या निधीचा योग्य वापर झाल्यास सदर सदर डागडुजी काही महिने चांगली राहू शकते. पण पुढे पाठ मागे सपाट अशी परिस्थिती होवून पुन्हा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य स्थापित होण्याची शक्यता आहे. डांबराचे प्रमाण अत्यल्प असल्याने सदर खड्डे एकाच पावसात उघडे पडतात. सध्या पावसाचे दिवस असल्याने आज डागडुजी केलेले खड्डे उद्या उघडे पडतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे काम चांगल्या दर्जाचे करावे अशी मागणी प्रवासी करीत आहे.(वार्ताहर)
रस्त्याच्या डागडुजीत डांबर नावालाच
By admin | Published: September 21, 2016 1:17 AM