लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उन्हाळ्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामावर मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्यांना मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मार्गावरचे खड्डे बुजविण्याचे काम केले. आता मात्र पहिल्याच पावसात ग्रामीण भागात व शहरी भागात रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. या खड्ड्यांतून नागरिकांना वाट काढणे कठीण झाले आहे. वर्धा शहरालगतच्या यवतमाळ मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे रस्त्यावर पडले आहेत. या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक होत आहे. तसेच अनेक दुचाकीस्वारांना अपघातही झालेले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. सेवाग्राम ते खरांगणा गोडे या मार्गावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच व्हीआयपी रोडपासून म्हसाळा वरूड कडे जाणाऱ्यावर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी मुलांना घेऊन जाणारे शेकडो वाहने जातात. मध्यंतरी अग्रगामी शाळेच्या पालकांनी या खड्ड्यांबाबत स्थानिक आमदारांकडे तक्रार केली होती. त्यानंतर म्हसाळा ते वरूड या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचे फलक लावण्यात आले अजूनही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. भर पावसाळ्यात अॅटो चालकांना कसरत करावी लागत आहे. पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांत चिखल पाणी जमा होते व अनेकदा नागरिकांच्या अंगावरही ते पाणी उडते. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याची अतिशय दशनिय अवस्था झाली आहे.पांदण रस्त्यांचेही हालजिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून जिल्ह्यात अनेक पांदन रस्त्यांचा विकास करण्यात आला. मात्र पावसाळ्याच्या दिवसात या पांदन रस्त्यांमध्ये चिखल निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना शेतीसाहित्य शेतात नेताना पायी न्यावे लागत आहे. पादंन रस्त्यातून बैलबंडी जाणे कठीण झाले आहे. शासनाने पांदन रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सेलू तालुक्यातील जाखाळा शिवारात शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच वर्धा शहरातही विकास कामे मोठ्या प्रमाणावर झालीत. तरीही अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. या रस्त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
पावसाने लावली रस्त्यांची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:54 PM
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उन्हाळ्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामावर मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्यांना मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मार्गावरचे खड्डे बुजविण्याचे काम केले.
ठळक मुद्देशहरी व ग्रामीण भागात खड्डेच खड्डे : बांधकाम विभागाचा खड्डेमुक्त महाराष्ट्र कार्यक्रम फेल